Mumbai News : मुंबईत सोने-हिऱ्यांच्या तस्करीत ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त!

  89

मुंबई : सोने आणि हिऱ्यांची तस्करी प्रकरणी मुंबईत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण २.२८६ किलो सोने आणि हिरे जप्त केले, ज्यात सोन्याची किंमत अंदाजे १.५८ कोटी रुपये आणि हिऱ्यांची किंमत १.५४ कोटी रुपये आहे. या प्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त (Gold Seized) करण्यात आला आहे.


मुंबई सीमाशुल्क विभागाने पहिल्या प्रकरणात, दुबईहून मुंबईत येणाऱ्या एका संशयीत प्रवाशाला थांबवण्यात आलं आणि त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यात २४ कॅरेट सोन्याचे १२ बार (एकूण वजन १४०० ग्रॅम), अंदाजे किंमत ९७,००,२३६ रुपये आहे. हे सोने प्रवाशाने पॅन्टच्या बेल्टजवळ लपवले होते.


चौकशी दरम्यान प्रवाशानं सांगितलं की, हे कृत्य त्याच विमानामधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाच्या सांगण्यावरून केलं आहे. सहप्रवाशानेही आपल्या निवेदनात हे मान्य केले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.


दुसऱ्या प्रकरणात, हाँगकाँगहून मुंबईकडे येणाऱ्या एका प्रवाशाला थांबवून त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये दोन २४ कॅरेट सोन्याच्या बांगड्या (एकूण वजन ८८६ ग्रॅम, किमतीचे ६१,३८,८६४ रुपये), रोलेक्स घड्याळ (१३,७०,५२० रुपये किमतीचे) होते. तर १,५४,१८,५७५ रुपये किमतीचे हिरे जप्त करण्यात आले. सोने, रोलेक्स घड्याळ प्रवाशाने परिधान केले होते, तर हिरे प्रवाशाने परिधान केलेल्या बनियानच्या आत एका विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवले होते. या प्रकरणी त्या प्रवाशाला अटकही करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला