दोस्त : कविता आणि काव्यकोडी

कोकीळ कुहुकुहू
गाणे गातो
वसंत ऋतूची
चाहूल देतो

‘पेरते व्हा’ सांगत
पावशा येतो
पावसाच्या सरी
देऊन जातो

रानात पावसाला
चढतो जोर
पिसारा फुलवून
नाचतो मोर

आकाशात घिरट्या
घालती घारी
उंदरांना त्यांची
भीतीच भारी

आवाजाची नक्कल
पोपट करी
माणसासारखी
फुशारकी मारी

कोंबडी, कबुतर,
कावळा, चिमणी
सारेच खेळतात
आपल्या अंगणी

पाखरे आपले
असतात दोस्त
त्यांच्यासोबत
वेळ जाई मस्त

पाखरांसाठी चला
फुलवूया बागा
पर्यावरणाची ते
राखतात निगा

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) हवेत गारवा,
फुललेली फुले.
पक्ष्यांची किलबिल,
झाडही डोले.

पूर्व दिशा येई,
हळूहळू उजळून.
वेळ सांगा कोणती,
मन जाई फुलून?

२) भगवंताच्या पूजेत,
हिला स्थान मानाचे.
दारी वृंदावन,
शोभून दिसे हिचे,

मानवाच्या आरोग्यास,
उपकारक ठरते.
कोणत्या वनस्पतीचे,
लग्न लावले जाते?

३) थंडीला मुळीच,
तो घाबरत नाही.
अंगावर केस याच्या,
भरपूर राही.

बर्फाळ प्रदेशात,
फिरे चहुकडे.
लोकांच्या उपयोगी,
कोण बरं पडे?

उत्तर -


१) पहाट
२) तुळस
३) याक
Comments
Add Comment

बाग आणि बायका

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ सोसायटीच्या कोपऱ्यावर एक छोटीशी बाग आणि खूप सारी बाके होती. वृद्धांसाठी केलेली

हृदय परिवर्तन

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर हृदय परिवर्तन म्हणजे केवळ मत बदलणे नव्हे, तर विचार, भावना आणि वर्तन यांमधील

सहल

कथा : रमेश तांबे सरांनी वर्गात सूचना वाचून दाखवली. पुढील महिन्यात वेरूळची लेणी बघण्यासाठी शाळेची शैक्षणिक सहल

घड्याळ अचूक वेळ कशी दाखवते?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता या दोन जुळ्या बहिणी खूपच अभ्यासू व जिज्ञासू होत्या. योगायोगाने सुट्टीनिमित्त

व्हिलन

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ अचानक एखादी बातमी वाचायला मिळते. ती बातमी अख्खा दिवस तुमच्या डोक्यात घोळत राहते.

पेरावे तसे उगवते

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर पेरावे तसे उगवते” ही एक जुनी, पण तितकीच सत्य आणि प्रभावी मराठी म्हण आहे. या