भंडाऱ्यात इमारतीचे छत कोसळले; ३० ते ४० महिला जखमी!

  74

भंडारा : गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जीर्ण इमारतीवर चढून विसर्जनातील डी. जे. व झाक्यांचा आनंद घेत असतानाच अचानक जीर्ण इमारतीच्या टिनाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीस ते चाळीस महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे घडली आहे.


लाखांदूर तालुक्यातील बारव्हा पेठ येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे वतीने गणेश उत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. दहा दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात आले. गणरायाचे विसर्जनासाठी डी. जे. व विविधरंगी झाकी, लेझीमच्या तालावर भाविक भक्त थिरकत असतानाच अचानक जीर्ण इमारतीचे टिनाचे छत कोसळले. शेडच्या वर आणि खाली अनेक महिला उभ्या होत्या. त्यांच्यावर टिनाचे शेड कोसळले.


मात्र, सिमेंटचे छताखाली टिनाचे शेड असल्यामुळे महिला जखमी झाल्या. लागेच जमावाने सर्व टिनाचे शेड उचलून धरले व जखमींना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा येथे दाखल करण्यात आले. सर्व महिला किरकोळ जखमी असुन मोठी दुर्घटना टळली आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट ! पालघर जिल्ह्यात आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील काही भागांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा

तीन महिन्यात पुणे एसटी विभागाने केली कोट्यवधींची कमाई

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध भागांतील नागरिकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी तब्बल २५ लाख किमीचा प्रवास

अंत्यसंस्काराची तयारी; तो चक्क जिवंत परतला घरी आणि एका क्षणात वातावरण बदलले

जळगाव : रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाइकांनी ओळख पटवत त्याचे शवविच्छेदनही करून घेतले. घरी तिरडी आणली

College students clashes: पुण्यात भरदिवसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा, कॅम्पसमध्ये कोयते आणि हातोड्याने हल्ले

पुणे: शैक्षणिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यातच विद्यार्थ्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. एका नामांकित

जळगाव बस अपघाताप्रकरणी आमदार जावळे संतापले, PWD अधिकाऱ्यांना दिला दम

जळगाव: भुसावळ रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. इंदूरहून जळगावकडे जाणारी श्री गणेश लक्झरी खासगी बस आमोदा

CM Fadnavis podcast Maharashtra Dharma: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

'महाराष्ट्रधर्म' या विशेष पॉडकास्ट मालिकेचे पहिले चरण प्रदर्शित मुंबई: ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि