Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Pune Road : मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुसाट! अटल सेतूला एक्स्प्रेस...

Mumbai Pune Road : मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुसाट! अटल सेतूला एक्स्प्रेस वे जोडणार

मुंबई : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे प्रवाशांची वाढती संख्या तसेच वाहनांची मोठी गर्दी पाहता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अटल सेतू (Atal Setu) पुलाजवळ १४ पदरी रस्ता बनवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अटल सेतूवरुन खाली उतरल्यानंतर १४ लेन असणारा रस्ता तयार केला जाणाऱ्या या कामाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. नागरिकांच्या या गोष्टीला आता पुर्णविराम मिळाला असून त्याबाबत आता लवकरच अटल सेतूला एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Express Way) जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास आणखी गतीने होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते मुंबई रस्तेमार्गे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका असलेला अटल सेतू मार्ग आता शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात येणार आहे. या नव्या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी तब्बल १७ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या नव्या महामार्गामुळे अटल सेतुवरुन (Atal Setu) थेट सोलापूर आणि सातऱ्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. त्याचबरोबर नव्या महामार्गामुळे पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि बंगळुरू प्रवास अतिशय सोपं होणार आहे.

कसा असेल नवा महामार्ग?

नव्या प्रस्तावित महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी थेट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जाईल. १३० किलोमीटर लांबीचा हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग चौक-पुणे-शिवारे जंक्शन असा असेल. या मार्गावर वेगवान प्रवासासाठी एकूण ८ लेन असतील. या रस्त्याच्या बांधणीसाठी तब्बल १७ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पुण्याला रिंग रोडने जोडणार 

तयार होणारा नवीन महामार्ग पुण्याला रिंग रोडने जोडला जाईल आणि पुढे बेंगळुरूपर्यंत विस्तारेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. तसेच अटल सेतूजवळ १४ पदरी रस्ता तयार केला जाईल. जो पुढे पुण्याला रिंग रोडने आणि नंतर बेंगळुरूला जोडला जाईल. जेणेकरुन या रस्त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ५० टक्क्याने कमी होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -