मुंबई: जर तुम्हीही डायबिटीजने त्रस्त असाल आणि डायबिटीज नियंत्रणात ठेवायचा असेल तर शिळ्या चपातीचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दरम्यान, कोणतेही अन्न जे १५ तास आधी शिजवलेले असेल त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
अशातच चपाती बनवल्यानंतर १२-१५ तासांच्या आत खाऊन घ्या. लक्षात घ्या की याआधी बनवलेली शिळी चपाती खाऊ नका.
तज्ञांच्या मते, चपाती शिळी झाल्याने त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. अशातच शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत होते.
अशा चपातींमध्ये व्हिटामिन बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.
अनेक तज्ञ तर असाही दावा करतात की शिळी चपाती खाल्ल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. पोटाच्या समस्या दूर होतात.
अशी खावी शिळी चपाती
दरम्यान, शिळी चपाती एका विशिष्ट पद्धतीने खाल्ल्यास त्याचे अनेक फायदे होतात. यासाठी शिळी चपाती दुधात भिजवून १०-१५ मिनिटांसाठी ठेवा. यामुळे शिळ्या चपातीचे पोषणतत्व वाढतात. ही शिळी चपाती तुम्ही कधीही सेवन करू शकता.