दीपिकाच्या घरी आली लक्ष्मी, आली आणखी एक खुशखबर

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घरी आनंदीआनंद आला आहे. त्यांची बेबी गर्ल अभिनेत्रीच्या घरी पोहोचली आहे. सध्या दीपिका छोट्या परीची देखभाल घेत आहे. रणवीरलाही बाबा झाल्यानंतरही प्रचंड आनंद झाला आहे.


छोट्या परीच्या आगमनानंतर दीपिकाच्या घरी आणखी एक खुशखबर समोर आली आहे. ती ही की अभिनेत्रीच्या कंपनीने १८४५ स्क्वे फूटचा नवा अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत १७.८ कोटी रूपये आहे.


हे अपार्टमेंट मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथे आहे. १२ सप्टेंबरला याचे रजिस्ट्रेशन झाले आहे आणि डील इन झाली. यात ४ आणि ५ बीएचके अपार्टमेंट्स बनलेले आहेत.


दीपिकाचा फ्लॅट १५व्या मजल्यावर आहे. ३० हजार रजिस्ट्रेशन चार्जेस आणि १.०७ कोटी रूपये रजिस्ट्रीम्ध्ये लागले आहेत. रणवीर सिंहच्या आईने ५ सप्टेंबरला या बिल्डिंगमध्ये भाड्यावर घर घेतले आहे. त्यांचे महिन्याचे भाडे ८.२ लाख रूपये आहे. तर डिपॉझिट ७३.८ लाख रूपये आहे. ५५ महिन्यांसाठी रणवीरची आई भाड्याने राहणार आहे.


३३ महिन्यांपर्यंते ते ८.२ लाख रूपये दर महिन्याला भरतील. यानंतर पुढील २२ महिन्यांसाठी किंमत ९.४३ लाख रूपये भरतील.


मुलीसोबत दीपिका आणि रणवीर या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. त्यामुळे दीपिका आपल्या सासूच्या शेजारीच राहणार आहे.

Comments
Add Comment

₹370 Biryani Controversy : '३७० रुपयांची बिर्याणी वसूल करायची होती'; एका वक्तव्यामुळे तरुणाला गमवावी लागली नोकरी

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) केलेल्या एका टिप्पणीमुळे एखाद्याचे आयुष्य आणि करिअर (Career) कसे प्रभावित होऊ शकते, याचे

Amruta Khanvilkar's New Bollywood Movie : बॉलिवूडच्या 'रामभूमी'त अमृता खानविलकरची एन्ट्री; बॉलिवूडच्या 'या' सुप्रसिद्ध कलाकाराबरोबर काम करण्याची संधी!

मुंबई : आपल्या अभिनय (Acting) आणि नृत्यकौशल्याने (Dance Skills) प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर

Marathi Actor Shashank Ketkar : लग्नसंस्था आणि Live-in Relationship वर शशांक केतकरचं मोठं विधान!

मुंबई : मराठी अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) आपल्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. सामाजिक (Social)

Kashil Accident :अभिनेत्री पूजा सावंत यांच्या गाडीला सातारा जिल्ह्यात अपघात; सुदैवाने सर्वजण सुखरूप

Satara: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत यांच्या गाडीला सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे भीषण

Me Savitribai Phule :'१४ जूनला प्रवास थांबेल, पण गोष्ट नाही'; अमोल कोल्हेंची भावनिक पोस्ट व्हायरल

स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' (Me savitribai Jyotirao phule) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असली

Samarth Panel : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या