Jio Diwali Offers : जिओ फायबर वापरकर्त्यांना मिळणार दिवाळी धमाका; रिलायन्सने आणली विशेष ऑफर!

मुंबई : इंटरनेट क्षेत्रात नावाजलेली रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) कंपनी सातत्याने ग्राहकांच्या सेवेसाठी नवनवीन सेवा उपलब्ध करुन देत असते. या कंपनीने ग्राहकांसाठी वायरलेस तंत्रज्ञान वापरून भारतभरात ‘जिओ एअर फायबर’ (Jio AirFiber) वायरलेस ब्रॉडबँड सेवा सुरू केली. अशातच अनेक कंपन्यांकडून सणासुदीच्या काळात विविध ऑफर उपलब्ध करुन दिल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर रिलायन्सने ग्राहकांसाठी दिवाळी सणासाठी एक विशेष ऑफर आणली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ग्राहकांसाठी 'दिवाळी धमाका' (Diwali Dhamaka) ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरद्वारे जिओ एअर फायबर वापरणाऱ्या सर्व युजर्सना एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे. सर्वात स्वस्त वार्षिक जिओ एअर फायबर (Jio AirFiber) प्लॅनची ​​किंमत लक्षात घेता किमान ७,१८८ रुपयांची ऑफर १९ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.



ऑफरचा फायदा घेण्यासाठी नव्या ग्राहकांना काय करावे लागेल?


ही ऑफर सध्याच्या नवीन एअरफायबर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. नवीन युजर्स Jio AirFiber साठी १२ महिन्याचे रिचार्ज कूपन मिळविण्यासाठी रिलायन्स डिजिटल किंवा माय जिओ स्टोअरमधून किमान २०,००० रुपयांची खरेदी करावी लागेल. फ्री सबस्क्रिप्शनसाठी ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, इतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणे यांसारख्या उत्पादनांची खरेदी करावी लागेल.


तर, जिओ एअरफायबरच्या जुन्या ग्राहकांना २,२२२ रुपयांचे दिवाळी रिचार्ज आणि १२ महिन्यांचे एअरफायबर रिचार्ज कूपन दिले जाईल. हे कूपन नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वैध असतील. तसेच नवीन व आधीचे जिओ एअरफायबर युजर्स सहजपणे याचा लाभ घेऊ शकतात.


याशिवाय, प्रत्येक जिओ एअरफायबर्स कनेक्शनसह वापरकर्त्यांना ८०० पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि १२ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सदस्यतादेखील मिळेल.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत