भाईंदर : शिवसेना उबाठा गटाचे उप जिल्हाप्रमुख, माण तालुका संपर्क प्रमुख तसेच मीरा भाईंदर मधील दमदार नेतृत्व अशी ओळख असलेले शंकर वीरकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपात प्रवेश केला आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात एकीकडे ढोल ताशे वाजवत गणेश विसर्जन होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेचा ढाण्या वाघ समजला जाणाऱ्या शिवसेना उबाठा गटाचे उप जिल्हाप्रमुख, माण तालुका संपर्क प्रमुख शंकर वीरकर आणि युवती सेना विधानसभा अधिकारी आकांक्षा वीरकर यांनी आपल्या १८५ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते तसेच माजी उप महापौर हसमुख गहलोत, माजी सभागृह नेते प्रशांत दळवी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यात महिला आघाडी आणि युवती सेना सुध्दा मोठ्या संख्येने होती.
शंकर वीरकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे मीरा भाईंदरमध्ये उबाठाला प्रचंड खिंडार पडले आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाची बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली आणि गणेश विसर्जन असूनही त्यांच्या निवासस्थानी मोठी रीघ लागली. वीरकर गेली २९ वर्षे शिवसेनेत कार्यरत होते. कुस्ती संघटनासह अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थेशी संबंधित असुन मीरा भाईंदर मधील शिवसेना वाढीस त्यांचा मोठा सहभाग होता.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…