Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीRailway Job : कोकण रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी! भरघोस पगारासह अनेक पदांची...

Railway Job : कोकण रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी! भरघोस पगारासह अनेक पदांची मेगाभरती

‘असा’ करा अर्ज

मुंबई : सध्या अनेक तरुण भरघोस पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात असतात. त्यातच रेल्वेतील नोकऱ्यांबाबत देशभरातील तरुणांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेमध्ये (Konkan Railway Recruitment 2024) अनेक पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या पदांची भरती

कोकण रेल्वेने एकूण १९० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये वरिष्ठ स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंतच्या विविध पदांचा समावेश आहे. वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ञ, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल पर्यवेक्षक, ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट मॅन या पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.

कसा करावा अर्ज?

कोकण रेल्वेच्या भरतीसाठी उमेदवार कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट konkanrailway.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच या पदांसाठी फक्त गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मूळ लोकच अर्ज करू शकणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ विभाग अभियंता इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, मॅट्रिक पास उमेदवार तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज करू शकतात, परंतु त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय डिप्लोमा असावा.

वयोमर्यादा

या भरतीसाठी १८ ते ३६ वयोगटातील उमेदवार पात्र आहेत.

वेतन

वरिष्ठ विभाग अभियंता ४४ हजार ९०० रुपये प्रति महिना (पगार स्तर ७), स्टेशन मास्टर रुपये ३५ हजार ४०० रुपये प्रति महिना (पगार स्तर ६), कमर्शियल पर्यवेक्षक रुपये ३५ हजार ४०० रुपये प्रति महिना (पगार स्तर ६), गुड्स ट्रेन मॅनेजर रुपये २९ हजार २०० रुपये प्रति महिना (वेतन स्तर ५) आणि तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) यांना दरमहा रुपये १९ हजार ९०० रुपये (वेतन स्तर २) वेतन मिळेल.

याचबरोबर अधिक माहितीसाठी उमेदवार कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट konkanrailway.com ला भेट देऊ शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -