Lalbaugcha Raja Visarjan : पुढच्या वर्षी लवकर या! २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला भाविकांचा निरोप

मुंबई : 'ही शान कोणाची, लालबागच्या राजा'ची अशा निनादात काल सकाळी मंडपाबाहेर पडलेला लालबागचा राजाचं (Lalbaugcha Raja Visarjan 2024)  अखेर २३ तासांनी विसर्जन झालं आहे. गिरगाव चौपाटीवर महाआरती करून बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. यावेळी गिरगाव चौपाटी गणेशभक्तांनी फुलून गेली होती.


दहा दिवस बाप्पाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात मुंबई पुण्यासह सर्व भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाहेर पडले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत बाप्पाच्या विसर्जनासाठी असंख्य भक्त रस्त्यावर उतरले होते. मुंबई लालबाग परिसरातील केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या लालबागच्या राजामुळे लालबाग, परळ, भायखळासह गिरगाव चौपाटीच्या दिशेकडचे सर्व रस्ते खुलून गेले होते.



असं झालं राजाचं विसर्जन


राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ठिकठिकाणी बाप्पावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रात्रभर मुंबईच्या रस्त्यांवर गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आज सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर बाप्पाची दिमाखात महाआरती करण्यात आली. त्यानंतर राजाला विसर्जनाच्या दिशेकडे नेण्यात आले आणि राजाला तराफ्यावर बसवण्यात आले. यावेळी कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला बोटींची सलामी देण्यात आली. समुद्राच्या मध्यभागी तरफा थांबवण्यात आला. अत्याधुनिक तराफ्यातून राजाची मूर्ती खोल समुद्रात विसर्जित करण्यात आली. यावेळी प्रत्येक भाविकाचे डोळे पाणावले होते.

Comments
Add Comment

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या