Amit Shah : दहशतवाद जमिनीत गाडून टाकू- अमित शाह

किश्तवाड : जम्मू-काश्मिरातील विरोधी पक्ष हे कुटुंब केंद्रीत राजकारण करणारे आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना राज्यात दहशतवाद वाढवायचा आहे. परंतु, भाजपा सरकार सत्तेत आल्यास दहशतवाद (terrorism) जमिनीत गाडून टाकू असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले.


जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथे सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवर 'आपल्या कुटुंबाचे सरकार' बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेवर येऊ शकत नसल्याचे शाह म्हणाले. याशिवाय, ओमर अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांना राज्यात पुन्हा एकदा दहशतवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप सरकार दहशतवाद जमिनीत गाडून टाकेल असे शाह यांनी सांगितले.


काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरला पुन्हा दहशतवादाकडे ढकलायचे आहे, असे सांगत अमित शाह म्हणाले की, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आले तर दहशतवाद सुरू होईल. मी तुम्हाला वचन देतो. आम्ही दहशतवादाला गाडून टाकू. आम्ही दहशतवादाला अशा स्तरावर गाडून टाकण्याचा संकल्प केला आहे की, तो परत येऊ शकत नाही." याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे वातावरण पाहत असल्याचे सांगत ना अब्दुल्लांचं सरकार बनतंय ना राहुल गांधींचं सरकार. यावेळी खोऱ्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा दावा अमित शाह यांनी केला.

Comments
Add Comment

नवी पार्टी, नवे समीकरण ; महुआत तेज प्रतापांची परीक्षा

बिहार : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून सर्वच जागांवरून पहिल्या टप्प्यातील आकडे समोर

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा पाहाल? जाणून घ्या सविस्तर

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असल्यामुळे आकडेवारी वेगाने समोर येत आहे. तथापि, जर तुम्हाला

Bihar Election 2025 Results : बिहार विधानसभेत बहुमतासाठी किती जागांची गरज? जाणून घ्या फॉर्म्युला

पटणा : बिहारमध्ये कोणाची सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज स्पष्ट होणार आहे. सध्या राज्यातील विधानसभा

नितीश कुमार होणार मुख्यमंत्री! मतमोजणीची आकडेवारी येताच नेत्यांचा जल्लोष

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतांची मोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एनडीएला आघाडी मिळत

अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची दमदार आघाडी

बिहार : बिहारच्या अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर यांनी

दिल्ली स्फोट : दिल्ली स्फोटातील मुख्य आरोपी उमरच्या घरावर बुलडोझर! जम्मू-काश्मीर पोलिसांची धडक कारवाई

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी (सायंकाळी ७ वाजता) झालेल्या भीषण स्फोटामुळे देशात खळबळ उडाली