AK47ने डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्समध्ये गोळीबार, एका संशयिताला अटक

मुंबई:फ्लोरिडा पाम बीचवर ट्रम्प गोल्फ क्लबच्या बाहेर रविवारी गोळीबाराची घटना समोर आली. अमेरिकेचे राष्ट्रपती निवडणुकीसाठीचे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित आहेत. घटनेनंतर ट्रम्प गोल्फ कोर्सच्या जवळपास एफबीआय आणि सिक्रेट सर्व्हिस ब्रीफिंग करत आहे. या घटनेच्या तपासाची जबाबदारी एफबीआयकडे सोपवण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे आहे की या घटनेचा तपास हत्येचा प्रयत्न या रूपात केला जात आहे.


सिक्रेट सर्व्हिस अधिकाऱ्यांनी सांगितले की घटना रात्री २ वाजण्याच्या काही वेळ आधी घडली. अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की माजी राष्ट्रपतींवर कथित गोळीबार झाला होता की नाही. सिक्रेट सर्व्हस अधिकाऱ्यांच्या मते ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यांनी या प्रकरणी तपासही सुरू केला आहे.


ट्रम्पचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरने स्थानिक लॉ प्रवर्तनाचा हवाला देताना सांगितले की झाडाझुडुंपांमध्ये एके ४७ रायफल आढळली आणि एका संशयित व्यक्तीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.



एफबीआयचे विधान


एफबीआयच्या विधानानुसार, एजन्सीने वेस्ट पाम बीच फ्लोरिडाला उत्तर दिले आहे आणि सांगितले की ते या घटनेचा तपास करत आहेत. एजन्सीने म्हटले की हे प्रकरणा माजी राष्ट्रपती ट्रम्प यांच्या हत्येच्या उद्देशाने केल्याचे समोर येत आहे. संशयित व्यक्तीकडे एक स्कोपवाली एके ४७ आणि एक गोप्रोही होताय. बंदुकधारी ट्रम्प यांच्यापासून ३००-५०० गज दूर होता. सीक्रेट सर्व्हिसने संशयितावर गोळीबार केला आणि कमीत कमी चार गोळ्या झाडल्या. दरम्यान, या हल्लेखोराने गोळीबार केला होता की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

Comments
Add Comment

'ऑपरेशन सिंदूर'ने अझर मसूदच्या कुटुंबालाच संपवले; तुकडे तुकडे केले!

नवी दिल्ली: भारताच्या धडक कारवाईने दहशतवाद्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. आपल्या देशाच्या सुरक्षेला

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला, अमेरिकेचा ड्रग्ज जहाजावर मोठा हल्ला

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाहून अमेरिकेकडे येत असलेल्या एका संशयित ड्रग्ज जहाजावर पुन्हा एकदा लष्करी

नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या