काळवेळ काही आहे की नाही…उठलं का सुटलं….वेळेचं काही भानच नसतं कोणाला…
हे झालं सरेआम वापरात असलेलं, वेळेची किंमत असणाऱ्यांच ब्रीदवाक्य!!
पण…‘वखत’ हा गावरान शब्द वेळेची अस्सल किंमत दाखवून देतो माणसाला!
वेळेची कदर असणारी व्यक्ती वक्तशीर म्हणून आदरणीय वाटते, अशा व्यक्तीला स्वत:च्या वेळेची तर असतेच पण दुसऱ्याच्या वेळेला ही तितकेच महत्त्व देणारी असते…
पण कधी उलट ही असू शकतं!!
कधी अतिवक्तशिरपणा दुसऱ्याला धारेवर धरतं
असं ही नसावं…
म्हणूनच म्हणतात प्रत्येकाची वेळ यावी लागते त्याचं महत्त्व कळायला…
वक्त… वक्त की बात है!!
कोणाचाही जास्त वेळ घेऊ नये पण गरज असल्यास वेळ नक्की द्यावा.
परीक्षा, कार्यक्रम, इंटरव्यू या ठिकाणी वेळेला फार महत्त्व आहे. पेपर लिहिताना तर नजर काट्यावरच असते…वाटतं…
वक्त से कहेना जरा…
वो ठहेर जायें वहीं!
वेळ सांगून येत नाही
असे नेहमी म्हटलं जातं…
खरंच… वेळेला बोलता आले असते तर कित्येक प्रश्न न बोलता सुटले असते!
वक्त ने किया क्या हंसीं सितम…
कोणालाही थाप मारताना, वेळच मिळाला नाही… किंवा नसतो हे गणित बरं जमतं… पण… खरंच… वेळ नसतो का…काढला तर असतो… शेवटी वेळ काढणं हे इच्छेवर अवलंबून असतं!!
यावरुन आठवलं…
‘वेळ काढणं ‘हा दुसरा प्रकार!!
वेळ काढू धोरण, टाईम पास, आयुष्यात काहीच करण्याचं ध्येय नसणं… ते म्हणजे वेळेचं अजिबात महत्त्व नसणं.
याचे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्त असतात…शारीरिक व मानसिक सुद्धा!!
म्हणून कुठल्याही वयात वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. मनाचा आनंदोत्सव साजरा करायला वेळेचं बंधन नसतं आणि नसावंच!
बस… वेळ येऊ द्या…सगळं ठीक होईल…निराशमय मन सुद्धा आशा करत असतं. शेवटी काळ ठरवतो सर्व!
काळ आला होता पण वेळ आली नव्हती, वेळ आणि काळ यांची अजब सांगड आहे…काळवेळ!!
काळ, काम, वेग हा मंत्र… आयुष्याचं तंत्र योग्य रितीने सांभाळतो!!
वक्त से पहले और वक्त के बाद
कुछ मिलता नही!!
वक्त आने दो…
वक्त का इंतजार करो!
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…