मुंबई: डायमंड लीग फायनलमध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राकडून अपेक्षा असतील. शनिवारी रात्री उशिरा त्याचा सामना रंगणार आहे. नीरजचे यावेळी ९० पार भाला फेकण्याचे लक्ष्य असेल.
नीरज पार करू शकेल ९०चा आकडा
नीरज चोप्राचा सर्वोत्कृष्ट थ्रो ८९.९४ मीटरचा आहे. हा थ्रो त्याने ३० जून २०२२ला स्वीडनमध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये केला होता. यापेक्षा जास्त लांब थ्रो नीरज चोप्राला अद्याप करता आलेला नाही. अशातच नीरचचे लक्ष्य ९०पार असेल.
अविनाश साबळेची निराशा
नॅशनल रेकॉर्ड होल्डर अविनाश साबळेने डायमंड लीग फायनलमध्ये कमी वेळेसह नववे स्थान मिळवले. ब्रुसेल्समध्ये ३००० मीटर स्टीपलचेजमध्ये शुक्रवारी ३० वर्षीय साबळेने डेब्यू डायमंड लीग फायनलमध्ये १० खेळाडूंमध्ये ८ मिनिटे आणि १७.०९ सेकंदाचा वेळ घेत नववे स्थान मिळवले.