Mumbai News : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; मुंबईतून २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त!

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी (prevent Adulteration) अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत मुंबईत करण्यात आलेल्या कारवाईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच याप्रकरणी दोघांविराेधात कारवाई करण्यात आली. देशभरात सप्टेंबर – डिसेंबरदरम्यान विविध उत्सव साजरे करण्यात येतात. या कालावधीत दूध, दूग्धजन्य पदार्थ, मिठाई, मावा, खवा आदी पदार्थांना मोठी मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आणि अधिक नफा कमावण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते.


अन्न आणि औषध प्रशासनाने अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध ठिकाणी खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने नुकतेच मुंबईतील मालाड येथील दोन दूध विक्रेत्यांवर छापा घातला. या छाप्यामध्ये अमूल, गोकुळ, महानंद या दूध कंपन्यांच्या दुधामध्ये भेसळ करण्यात येत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी सैदुल आगया दडपेली (३८) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ७ हजार २२२ रुपये किमतीचे १२२ लिटर दूध जप्त करण्यात आले. तर श्रीनिवासुलू रामस्वामी बंडारू (५२) यांच्याकडून ९ हजार ८०६ रुपयांचे १६३ लिटर दूध जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या दुधाचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून उर्वरित दूध नष्ट करण्यात आले.



१२ पथकाची घेतली मदत


अन्न आणि औषध प्रशासनाचे मुंबई विभागातील अन्न निरीक्षक ए. व्ही. कांडेलकर आणि ठाणे विभागातील पी. एस. पवार यांनी सहाय्यक आयुक्त डी. एस. महाले आणि सहआयुक्त एम. एन. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या कारवाईसाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथक १२ ची मदत घेण्यात आल्याची माहिती एम. एन. चौधरी यांनी दिली.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी