मुंबई: ‘सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला’ असे म्हणत माहेरपणासाठी आलेल्या गौराईंना आज भक्तिभावाने निरोप देण्यात आला. गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी घरी आलेल्या गौराईंचे विसर्जन अतिशय भक्तिभावाने करण्यात आले. काही ठिकाणी तर गौरींसह गणपतींचे विसर्जनही पार पडले. गणपतीच्या चौथ्या दिवशी गौरी आवाहन होते. तर सहाव्या दिवशी गौरींचे विसर्जन करण्यात आले.
गौरी विसर्जनाचा सोहळ्याची परंपरा विविध गावांमध्ये वेगवेगळी असते. कुडाळ तालुक्यातील पाट गावातही गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी १२ सप्टेंबरला गौरी विसर्जन अतिशय धामधुमीत पार पडले.
या दिवशी गौरीसाठी केल्या जाणाऱ्या भाजी-भाकरीचा नेवैद्य वाटण्याचा मोठा सोहळाच असतो. या दिवशी मिळणारी भाजी-भाकरीची चव तुम्हाला इतर कोणत्याच दिवशी येणार नाही.
तांदूळ, नाचणी अशा कोणत्याही धान्यांची भाकरी आणि शेवग्याचा पाल्यासह पाच प्रकारचा पाला घालून केलेली स्वादिष्ट भाजी यांचा नैवेद्य यावेळी देवीला अर्पण केला जातो.
पाट गावात याचा मोठा सोहळाच रंगतो. स्त्रिया-पुरूष सारेच या सोहळ्यात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. यावेळी पुजेसाठी गौराईची मूर्ती असतेच मात्र हळदीचे रोप ही खरी देवी असते. या देवीचे विहीरीच्या ठिकाणी विसर्जन केले जाते. भजन, आरती म्हणत देवीच्या विसर्जनाची मिरवणूक निघते. त्यानंतर प्रत्येक घरातून देवीसाठी आलेला नैवेद्य एकत्र केला जातो आणि संपूर्ण गावात वाटला जातो.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…