संत्रा फळांची होणार तत्काळ ग्रेडींग!

अमरावती : संत्रा फळांची तत्काळ ग्रेडींग आणि प्रतिकिलो या दराने खरेदी करुन नगदी चुकारा देण्याचा नवा प्रकल्प अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केला आहे. त्यामुळे यापुढे संत्रा उत्पादकांना केव्हाही संत्रा विक्री करता येणार असून त्यानुसार रक्कम मिळवता येणार आहे.


अचलपुर, चांदुरबाजारसह अंजनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हवा तेवढा लाभ या फळबागांपासून होत नसल्याने त्यांचे सतत आर्थिक नुकसान होत आहे. संत्रा खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून होणारा त्रास, करार करुनही वेळेवर सौदा रद्द करणे, बागेतील संत्रा नेल्यानंतर पैशासाठी त्रास देणे, अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.हा त्रास पाहता अचलपूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सभापती, उपसभापती यांच्यासह सर्व संचालकांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजार समितीच्या टिएमसी यार्डवर हैद्राबाद येथील चिफो ॲग्रोटेक कंपनी लि. या कंपनीशी करार करत नवा प्रकल्प उभा केला. यामुळे छोट्या-मोठ्या संत्रा बागायतदारांचा संत्रा ग्रेडींग करत खरेदी केली जाणार आहे. शिवाय त्यांना तत्काळ नगदी चुकारासुध्दा दिल्या जाणार आहे.


अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादनाचे क्षेत्र पाहता संत्रा खरेदीची स्थायी यंत्रणा निर्माण व्हावी व संत्रा फळांना योग्य भाव मिळावा यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. शेतकऱ्यांकडून आलेल्या फळाची ग्रेडींग करत खुल्या लिलाव पध्दतीने व्यापाऱ्यांनी दर निश्चीत केल्यानंतर किलो प्रमाणे भाव दिल्या जाणार आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे. बाजार समितीने या कंपनीला जागा उपलब्ध करुन दिली असुन कंपनीने त्या ठिकाणी ग्रेडींगची यंत्रणा बसविली आहे, असे समिती प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान संत्रा आणण्यासाठी कंपनीच्या वतीने कॅरेटची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. या सुविधेमुळे अल्प क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

Comments
Add Comment

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे

नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती