Mukhyamantri Yojnadoot : मुख्यमंत्री योजनादूत'चा लाभ घेण्यासाठी 'या' तारखेआधीच करा अर्ज!

जाणून घ्या वेतन, पात्रता आणि अर्ज पद्धत


मुंबई : राज्य सरकारने राज्यभरातील सर्व महिलांना सक्षम करण्यासाठी तसेच आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली. त्यानंतर लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojnadoot) उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत तरुणांना महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत नोकरीची (Job) संधी उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा करण्यात आली होती.


त्यानुसार महाराष्ट्रात तब्बल ५०,००० योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. याबबातची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मात्र या उपक्रमाच्या अर्जासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२४ असून तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे.



कसा करावा अर्ज?


योजनादूत या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना अर्ज करु शकतात. तसेच उमेदवाराला www.mahayojanadoot.org या वेबसाइटवर नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर उमेदवाराला वेबसाइटवर अर्ज केल्यानंतर ऑनलाइन अर्ज केलेली पत्र, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण कागदपत्रे, प्रमाणपत्रे, बँक खात्याचा पुरावा नियुक्तीच्या दिवशी सादर करणे आवश्यक आहे.



पात्रता आणि वेतन


योजनादूतसाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र असायला हवे. तसेच त्याला संगणकाचे बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे. योजनादूतांना १०,००० रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास