Friday, May 9, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Health Tips: ३० दिवस सलग खा रिकाम्या पोटी केळे, दूर होतील अनेक आजार

Health Tips: ३० दिवस सलग खा रिकाम्या पोटी केळे, दूर होतील अनेक आजार

मुंबई: दररोज केळे खाल्ल्याने पोट आणि शरीराशी संबंधिक अनेक समस्या दूर होतील. आरोग्य तज्ञांच्या मते दररोज १ केळे खाल्ले पाहिजे. यामुळे शरीरास अनेक फायदे मिळतात. फळांचा राजा भले आंबा असला तरी केळे खाल्ल्याने अनेक फायदे होतात.


केळे हे खाण्यास चविष्ट आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असे फळ आहे. केळे खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते. दररोज केळे खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. केळ्यामध्ये व्हिटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात.


केळ्यामध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी६, पोटॅशियन, सोडियम, आर्यन आणि अनेक दुसरे अँटीऑक्सिडंट असतात. केळ्यामध्ये हाय कॅलरीज असतात. तसेच हे खाल्ल्याने संपूर्ण दिवस तुम्हाला एनर्जेटिक वाटते. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्ब्स, फायबर, मॅग्नेशियम, कॉपरसारखी पोषकतत्वे असतात.



दररोज एक केळे खाल्ल्याने होतात हे फायदे


केळे खाल्ल्याने पाचन सुधारते. यामुळे दररोज १-२ केळी खाल्ली पाहिजेत. यामुळे पोट आणि पचन सुधारते. केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेशी सबंधित समस्या दूर होतात.

Comments
Add Comment