सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ ओझर व अस्मिता प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने ओझर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

जव्हार प्रतिनिधी(मनोज कामडी)- सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ ओझर आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने ओझर गावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. ओझर हे गाव डोंगरदऱ्यामध्ये असल्यामुळे आरोग्य, रस्ते नेटवर्क ,यांच्या मोठ्या समस्या आहेत तसेच आरोग्याची सुविधा नसल्यामुळे या परिसरातील रुग्ण आजारी असल्यास रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेत किंवा पतंगशाह कुटीर रुग्णालय जव्हार येथे जावे लागत असे मात्र या शिबिराला मुळे रुग्णांना मोफत तपासणी व औषधे देण्यात आले.


या आरोग्य शिबिरात एच बी, बी पी,रक्तातील साखर,सर्दी, ताप,खोखला,आणि या प्रकारच्या आजाराचे तपासण्या व चाचण्या तसेच सर्व औषधे विनामूल्य देण्यात आले. ई स्मार्ट क्लिनिक च्या माध्यमातून लघवी, सुगर, HB,BP, नाडीचे परीक्षण,वजन,उंची, टी बी,टायफाईड, या सारख्या ३० ते ३५ प्रकारच्या लघवी आणि रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या.


या आरोग्य शिबिराचा एकूण १३० रुग्णांनी लाभ घेतला हे शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी सुदाम उंबरसाडा सरपंच ग्रा. पं दाभलोन व आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान संस्थापक, अंकुश धोडदे,अनिल खरपडे, संतोष कोरडा,संकेत गडग,तसेच प्राथमिक उपकेंद्र कोरतड येथील डॉ.ज्योती मॅडम व MPW भोये सर यांनी विशेष सहकार्य केले , मंडळाचे सर्व पदाधिकारी व गावातील तरुण मंडळाने मोलाचे सहकार्य केले.

Comments
Add Comment

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड