Big Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात 'या' रांगड्या गडीची होणार वाइल्डकार्ड एन्ट्री!

  83

मुंबई : यंदाचा ‘बिग बॉस मराठी’ (Big Boss Marathi) चा हा नवा सिझन चांगलाच गाजत आहे. कार्यक्रमात असणारे सर्व कलाकारांमुळे यंदाच्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतेच बिग बॉस मराठीच्या घरात एलिमिनेशन झाले. यामध्ये छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडेला नारळ देण्यात आला. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठीने याबाबतचा नवा प्रोमो देखील शेअर केला. दरम्यान वाहिनीने नाव जाहीर केले नसले तरी प्रेक्षकांनी हा स्पर्धक कोण असेल याचा अंदाज वर्तवला आहे.


बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कोण वाईल्ड कार्ड सदस्य सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यादरम्यान अनेक नावे समोरही आली होती. याबाबत बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात खरचं वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार का? घरात कोण सदस्य येणार? अशा चर्चा रंगत होत्या. आता या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळणार आहे.


कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये 'तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा…अस्सल फौलाद घालणार ‘बिग बॉस’च्या घरात राडा, असे म्हटले आहे. त्यामुळे अरबाज, वैभवला टक्कर देणारा हा नवा सदस्य कोण?' या प्रश्नाचे कोडं आज सुटणार आहे.


दरम्यान, वाइल्डकार्ड म्हणून चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये बॉडीबिल्डर संग्राम चौगुले याचेही नाव चर्चेत होते. अनेकांनी कमेंट करत हा संग्राम असल्याचे म्हटले आहे. चाहत्यांनी कलर्सच्या या पोस्टवर संग्रामला टॅग करत शुभेच्छा दिल्या, शिवाय काहींनी संग्रामच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही कमेंट केल्या आहेत. परंतु हा स्पर्धक खरंच संग्राम आहे की आणखी कोण, हे आज भाऊच्या धक्क्यावरच समजू शकणार आहे.




Comments
Add Comment

Swwapnil Joshi: मराठी अभिनेता स्वप्नील जोशीसाठी 'फादर्स डे' झाला खास, लेकीसाठी लिहिली खास पोस्ट !

Swapnil Joshi Post on Fathers Day: प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा सुपरहिरो असतो आणि त्या बाबासाठी आपली लेक ही सर्वस्व असते! मराठी

अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर यांचे पार्थिव भारतात आणण्यात कायदेशीर अडचणी

बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूरचे १२ जून रोजी लंडनमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर,

हृदयविकाराने नव्हे तर मधमाशी तोंडात गेल्याने झाला संजय कपूर यांचा मृत्यू, कंगणाने केला खुलासा

नवी दिल्ली: बॉलीवूड क्वीन आणि भाजपची खासदार कंगना राणौतने इंस्टाग्रामवर करिश्मा कपूरचे  माजी पती संजय कपूरच्या

"उसकी आँखों से..." कुंभमेळयातील मोनालीसाचे रोमॅंटिक गाणे झाले प्रदर्शित

नवी दिल्ली: प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात माळा विकणारी मोनालिसा तिच्या घाऱ्या डोळ्यांमुळे चांगलीच प्रसिद्ध

Bollywood: करिश्मा कपूरवर कोसळला दु:खाचा डोंगर, करीना-सैफ आले भेटायला

मुंबई: बिझनेसमन आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचे गुरूवारी रात्री इंग्लंडमध्ये

विविध मागण्यांसाठी लेखकांनी घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

मुंबई : मानाचि लेखक संघटना मराठी भाषेतील मालिका नाटक व चित्रपटांच्या हौशी व व्यावसायिक लेखकांची संघटना आहे. या