मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने टीव्हीच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. बीएसएनएलने BSNL Live TV अॅप्लिकेशन आणले आहे. हे अॅप सुरूवातीला Android TVs साठी उपलब्ध आहे. हे तुम्ही गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करू शकता.
मिडिया रिपोर्ट्सनुसार हे अॅप WeConnectने पब्लिश केले आहे. BSNL Live TV सिंगल सीपीईच्या माध्यमातून इंटरनेट, केबल टीव्ही आणि लँडलाईन टेलीफोन सर्व्हिसेसच्या माध्यमातून वापरता येते. तर यात एक अँड्रॉईड बेस सिस्टीमच्या माध्यमातूनही हे ऑपरेट करता येते.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये बीएसएनएलने इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन सर्व्हिसला फायबरच्या माध्यमातून सादर करण्यात आले होते. आता याची किंमत खूप कमी ठेवण्यात आली आहे. याची सुरूवातीची किंमत १३० रूपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे.
बीएसएनएलचे पुढील ध्येय पुढील वर्षी पहिल्या सहामाही पर्यंत देशभरात ५ जी नेटवर्क लाँच करण्याचे आहे. नुकतेच प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले होते की बीएसएनएलने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत १५००० हून अधिक ४जी साईट्स बनवल्या आहेत. कंपनी लवकरच या साईट्सला ५जी रूपांतरित करण्यासाठी तयार आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…