लखनऊ: लखनऊच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये झालेल्या इमारत अपघातात रात्री उशिरा मलब्यातून आणखी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ८वर पोहोचली आहे. NDRF, SDRF आणि जिल्हा प्रशासन यांच्या टीम्स सध्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये व्यस्त आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जी तीन मजली इमारत कोसळली त्याची निर्मिती चार वर्षांपूर्वी झाली होती.
अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की रेस्क्यू ऑपरेशनमध्ये व्यस्त असलेल्या टीमने मलब्यातून तीन आणखी मृतदेह बाहेर काढले. यानंतर या अपघातातील मृतांची संख्या ८ झाली आहे. रिलीफ कमिश्नर जीएस नवीन यांनी सांगितले की एसडीआरएफने रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. राज किशोर (27), रुद्र यादव (24) और जगरूप सिंह (35) के रूप में की गई है. इससे पहले धीरज गुप्ता (48), पंकज तिवारी (40), अरुण सोनकर (28), राकेश लखनपाल (67), जसप्रीत सिंह साहनी(41) अशी मृतांची नावे आहेत.
मुसळधार पावसामुळे घडला अपघात
जिल्हा प्रशासनाचचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की मलब्याखाली आणखी कोणी अडकले नाहीये ना याची माहिती मिळवली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या इमारतीची निर्मिती चार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तसेच घटनेदरम्यानही काही बांधकाम सुरू होते. शनिवारी संध्याकाळी मुसळधार पावसानंतर साधारण ४.४५ वाजता ही घटना घडली तेव्हा अनेक जण ग्राऊंड फ्लोरवर काम करत होते.