स्वामी कृपेने मिळाली नोकरी

समर्थ कृपा - विलास खानोलकर


श्री स्वामी समर्थांकडून नोकरी लागण्याचा मुळेकरांना आशीर्वाद मिळाला होता. मुळेकर हे गाणगापुरास निघाले होते; परंतु पैसे कमी होते म्हणून पैशांअभावी श्री स्वामींच्या दर्शनास जाताना त्यांनी नारळ न घेता एक पैशाच्या खारका घेतल्या. श्री स्वामी समर्थांपुढे खारका ठेवून त्यांना नमस्कार केला. तेच महाराज म्हणाले की, ‘जा नारळ घेऊन ये. मुळेकरांनी चार आण्याचा नारळ आणला. श्री स्वामींपुढे ठेवून दर्शन घेतले. त्यामुळे गाणगापूरला जाण्याच्या प्रवासात चार आणे कमी पडू लागले. पण त्यास गाणगापूरच्या प्रवासात महाराजांनी चार आण्याच्या दुप्पट आठ आणे दिले. पैशाची तूट भरून निघाली. गाणगापूरची यात्रा करून ते घरी आले. श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मामलेदार झाले.


पोलिटिकल एजंट साहेबाच्या कचेरीत नोकरी, अव्वल कारकून, मामलेदार - फर्स्टक्लास मामलेदार झाले. श्री स्वामी समर्थ हे भक्तवत्सल तर आहेतच, पण आपल्याकडे येणाऱ्या भक्तांची पुरेपूर काळजी घेणारेही आहेत. गाणगापूरला दत्तप्रभूच्या दर्शनास जाण्यासाठी मुळेकरांस पैशाची गरज होती. म्हणूनच श्री स्वामी महाराजांपुढे नारळ ठेवण्याऐवजी खारका ठेवण्याचे मुळेकरांच्या मनात आले.


श्री स्वामीविषयी त्यांच्या मनात प्रेमभाव होताच, परंतु प्रवासात पैसे कमी पडतील, या चिंतेपोटीच त्यांनी श्री स्वामींपुढे नारळाऐवजी खारका ठेवल्या. श्री स्वामींकडून या गोष्टीकडे कसे दुर्लक्ष होईल? म्हणून ते मुळेकरांना लगेच म्हणाले, ‘जा नारळ घेऊन ये.’ नारळाविषयी स्वामींच्या मनात दुर्लक्ष कसे होईल, याचे परम आश्चर्य मुळेकरांस वाटले. येथेही महाराज ‘जा’ असे अगदी सहज म्हणाले. यातूनही त्यांना मुळेकरांस हेच सांगावयाचे होते की, पुढील प्रवासाची काळजी का करतोस? निःशंक रहावे महाराजांच्या या वचनाची प्रचिती चार आण्याऐवजी आठ आणे मिळून आनंद झाला. मुळेकरांना श्री स्वामी समर्थांनी त्यास पक्की नोकरी लावून निःशंक केले. हा झाला लाख रुपयांचा स्वामी कृपेचा लाभ.

Comments
Add Comment

संत तुकाराम

डॉ. देवीदास पोटे हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्धी सेवा देवाची हे ॥१॥ आवडी

समर्थ रामदास

- डॉ. देवीदास पोटे पेरिले ते उगवते पेरिले ते उगवते। बोलल्यासारिखे उत्तर येते। तरी मग कर्कश बोलावे ते। काय

अंधारातून प्रकाशाकडे

सद्गुरू वामनराव पै, जीवन संगीत । भाग ५ सध्या समाजामध्ये अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. "आपल्या हातात

गिरवीचे गोपालकृष्ण मंदिर म्हणजे दक्षिणेतील वृंदावन

सातारा : फलटणपासून १२ किमी. वर गिरवी नावाचं गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला गोपालकृष्ण मंदिर अर्थात भगवान गोपाळ

जेथे भाव तेथे देव

अर्चना सरोदे, मनाचा गाभारा देव लाकडात, पाषाणात किंवा मातीत नसतो, देव भावात असतो म्हणून त्याच्या प्रति असलेला भाव

परमार्थाची गोडी

प्राची परचुरे-वैद्य, आत्मज्ञान मानवी जीवनाचा प्रवास हा केवळ जन्म, उपजीविका आणि मृत्यू यांच्यामधील धावपळ इतकाच