Yek Number : आता येकचं नंबर! राज ठाकरेंच्या बायोपिकमध्ये झळकणार 'हा' अभिनेता

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या नाव-नवीन प्रयोग घडताना दिसत आहेत. प्रेक्षकांसाठी चित्रपटाच्या माध्यमातून हटके आणि वेगवेगळे विषय भेटीला येत आहेत. आता एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे स्वप्न पाहणारा मराठी चित्रपटसृष्टीला चित्रपट म्हणून आगामी ‘येक नंबर’ कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या दसऱ्याला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. राज ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित असणारा 'येक नंबर' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून या चित्रपटबद्धलची नवीन अपडेट समोर आली आहे. झी स्टुडिओज् बरोबर नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.'येक नंबर' हा चित्रपट येत्या १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.



राज ठाकरेंच्या बायोपिकमध्ये 'हा' रांगडा अभिनेता दिसणार


दसऱ्याचे मुहूर्तावर 'येक नंबर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. इतके दिग्गज या चित्रपटाशी जोडले गेले आहेत की, चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यातच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने ही उत्सुकता अधिकच वाढवली. या पोस्टरमधील तरुण कोण, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड इच्छा होती. तर आता या गोष्टीवरून पडदा उठला असून हा रांगड्या व्यक्तिमत्वाचा तरुण धैर्य घोलप असल्याचं समोर आलं आहे.



१० ऑक्टोबरला होणार प्रदर्शित चित्रपट


नुकताच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपामध्ये पाहायला मिळत असून, त्याच्या मनातील क्रोध देहबोलीतूनच व्यक्त होत आहे. याच्याव्यतिरिक्त या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरत आहे, ती एक करारी नजर, जी महाराष्ट्राच्या परिचयाची आहे. या सगळ्यात अधिक भर घालत आहे, ते गूढ, रहस्यमयी संगीत. त्यामुळे या सगळ्यामागे नेमके काय दडलं आहे, हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वरदा साजिद नाडियाडवाला आणि तेजस्विनी पंडित ह्या 'येक नंबर' चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर या चित्रपटाला, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला आपल्या संगीतावर ठेका धरायला लावणारे, अजय -अतुल यांचं धमाकेदार संगीत लाभलं आहे. संजय मेमाणे यांनी या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे.


दिग्दर्शक राजेश मापुस्कर चित्रपटाबद्दल म्हणतात, "मला या चित्रपटासाठी एक असा नवीन चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटेल. त्यामुळे धैर्यचा रांगडा लूक मला या व्यक्तिरेखेसाठी अतिशय उत्तम वाटला. त्यानेही या व्यक्तिरेखेला उत्तम न्याय दिला आहे.''


https://www.instagram.com/reel/C_fRp7rtN9G/?utm_source=ig_web_copy_link

'मराठी चित्रपटांमधील भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर दिसेल'


निर्माती तेजस्विनी पंडित म्हणाली की, ''प्रेक्षकांची अनेकदा तक्रार असते की, मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. आमचा हाच समज दूर करण्याचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसणार. या सगळ्याचे श्रेय या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला जाते.''


झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितलंय की, ‘प्रेक्षकांच्या मनात सुरूवातीपासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशा चित्रपटाशी आम्ही जोडले गेलो आहोत, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट, हिट आणि दर्जेदार चित्रपट दिले आहेत. आमची ही परंपरा या चित्रपटातही कायम राहील, याची आम्हाला अगदी खात्री आहे.’

Comments
Add Comment

Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर 'या' जेष्ठ अभिनेत्रीने केला 'केमो कर्ल्स'मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरशी

Eetha Movie : 'इठा' चित्रपटावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार! विठाबाईंच्या कुटुंबीयांचा संताप; म्हणाले, "इतिहासाची मोडतोड खपवून...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी 'इठा' (Eetha) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा

Star Pravah New Serial : 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ऐश्वर्या नारकर यांचं ८ वर्षांनी स्टार प्रवाहवर पुनरागमन; नव्या मालिकेत साकारणार हाडाच्या शिक्षिकेची भूमिका

मुंबई : शाळा (School) म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते वर्गखोल्या (Classroom), फळ्यावरचं लेखन (Blackboard), प्रार्थना (Prayer), मधल्या

Ratris Khel Chale Actress : ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंतांमध्ये नवा वाद! कृतिका तुळसकरने अपूर्वा नेमळेकरला ठणकावलं

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या लोकप्रिय मालिकेतील ‘शेवंता’ (Shevanta) या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

Amitabh Bachchan : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया; ICU मध्ये उपचारानंतर डिस्चार्ज, ब्लॉगमधून दिली प्रकृतीची माहिती

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती

Weekend Watchlist : या आठवड्यात ओटीटीवर काय पाहणार? ८ नव्या चित्रपट-वेब सिरीजची यादी

मुंबई : या आठवड्यात ओटीटीवर (OTT) काय पाहायचं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर ही यादी तुमच्यासाठीच आहे. २० ते २६