Ganeshotsav Konkan Railway: लालपरीला ब्रेक; प्रवाशांच्या पदरी निराशा! आता रेल्वे प्रशासनाकडून चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता

  107

गणेशोत्सवासाठी कोकण आणि मध्य रेल्वेचा मोठा निर्णय


मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला असताना मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. अशातच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे ऐन सणाच्या काळात लालपरीला ब्रेक लागल्यामुळे चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. उत्सवात कोकणात जाण्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांच्या पदरी निराशा असताना रेल्वे प्रशासनाकडून (Konkan Railway) आनंदाची बातमी समोर आली आहे.


येत्या शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी सर्वांच्या घरी गणराया विराजमान होणार आहे. मोठ्या संख्येने प्रवाशी गणरायाच्या आगमनासाठी गावाकडे निघाले आहेत. त्यातच एसटी वाहतूक सेवा बंद असल्यामुळे अनेकजण रेल्वे प्रवासाकडे वळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान कोकण आणि मध्य रेल्वेने विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची केली आहे.त्यामुळे गणरायाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरणार आहे.



गाडी क्र. ०११०३ / ०११०४ मुंबई सीएसएमटी - कुडाळ - मुंबई सीएसएमटी विशेष (अनारिक्षित)



  • गाडी क्रमांक ०११०३ सीएसएमटी येथून ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल. कुडाळला गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल.

  • गाडी क्रमांक ०११०४ कुडाळ येथून ५ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:३० वाजता सुटेल आणि सीएसएमटीला त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता पोहोचेल.

  • थांबे - दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, आणि सिंधुदुर्ग.

  • डबे - एकूण २० = सामान्य - १४ डबे,स्लीपर - ०४, एसएलआर -०२

Comments
Add Comment

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी