Stree 2 : 'स्त्री 2'ने केले ऐतिहासिक कलेक्शन, ५०० कोटींच्या जवळ पोहोचला सिनेमा

मुंबई: श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी सिनेमा 'स्त्री 2'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. १५ ऑगस्टला रिलीज झालेल्या या सिनेमाला १८ दिवस झाले आहेत. मात्र थिएटर्समध्ये याचा दबदबा कायम आहे. सिनेमाची दररोज कोट्यावधींची कमाई होत आहे. तसेच दररोज वेगवेगळे रेकॉर्ड बनत आहेत. आपल्या तिसऱ्या शनिवारच्या कलेक्शनसह 'स्त्री 2'ने नवा रेकॉर्ड बनवला आहे.


'स्त्री 2'च्या प्रॉडक्शन हाऊश मॅडॉक सिनेमांच्या मते १५ दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकूण ४५३.६० कोटी रूपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या माहितीनुसार १६व्या दिवशी सिनेमाने ८.५ कोटी रूपये कमावले होते. तर आता १७व्या दिवशीचे आकडे समोर आले आहे. 'स्त्री 2'ने तिसऱ्या शनिवारी १६ कोटी रूपयांची दमदार कमाई केली आहे.



५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला सिनेमा


'स्त्री 2'च्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत ४७८.१० कोटींचा बिझनेस केला आहे. यासोबतच हा सिनेमा ५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करण्याच्या जवळपास पोहोचला आहे.



जगभरात दमदार कलेक्शन


अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'स्त्री 2' या सिनेमाने जगभरातही खूप कमाई केली आहे. १५ दिवसांत या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा बिझनेस केला होता.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट