Kedarnath Helicopter Crash : भीषण अपघात! केदारनाथमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर हजारो फुटांवरुन थेट क्रॅश

एअरलिफ्ट करताना चेन तुटली, अन्... ; अपघाताचा थरार व्हिडिओ समोर


केदारनाथ : उत्तराखंडच्या केदारनाथ धाममधून आज सकाळी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी केदारनाथमध्ये उतरताना हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना आज पुन्हा अशीच घटना घडली आहे. भारतीय वायुसेनेचे एमआय - १७ या हेलिकॉप्टरची टोईग चेन तुटल्याने डोंगरात कोसळले. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून अद्याप कोणतीही हानी झाल्याची माहिती समोर आली नाही. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. परंतु केदारनाथमध्ते सततच्या होणाऱ्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये आठवड्यापूर्वी भारतीय वायुसेनेच्या एमआय - १७ हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे तात्काळ लँडिंग करण्यात आली होती. या हेलिकॉप्टरची दुरुस्ती करण्यासाठी लष्कराने दुसरे हेलिकॉप्टर आणले होते. बिघाड असलेल्या हेलिकॉप्टरला घेऊन सदरील हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण भरले. मात्र, त्याचवेळी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पायलटने पुन्हा लँडिंगचा निर्णय घेतला. परंतु, लँडिंग करण्याआधीच हेलिकॉप्टरची टोईग चेन तुटली. त्यामुळे दुसरे हेलिकॉप्टर आकाशात गरागरा फिरले आणि डोंगराळ भागात जाऊन कोसळले.


दरम्यान, या अपघाताचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे. तसेच या अपघातात कोणी जखमी झाले आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.




Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे