Mumbai Local : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्यापासून मालाडच्या फलाट क्रमांकांत होणार 'हे' बदल

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासन सध्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका बसवण्यासाठी ३५ दिवसांचा मेगाब्लॉक (Megablock) सुरु केला आहे. यामध्ये अनेक लोकल रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


अशातच पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड रेल्वे स्टेशनवरील मधल्या फलाटांचे क्रमांक देखील बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे काही दिवस प्रवाशांना गर्दीचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाणून घ्या स्थानकावरील नवी रुपरेषाबाबत सविस्तर माहिती.



काय आहेत बदल?



  • प्लॅटफॉर्म क्रमांक १ - फलाट क्रमांक १ वर धीम्या लोकलमधील प्रवाशांसाठी पश्चिम दिशेच्या दरवाजातून चढण्या-उतरण्याची सुविधा आहे. परंतु आता चढण्या-उतरण्यासाठी पूर्वेकडील दरवाजाचा वापर करावा लागणार आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून हे बदल लागू होतील.

  • प्लॅटफॉर्म क्रमांक २ - ८ सप्टेंबरपासून चर्चगेट दिशेला जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये पश्चिमेकडील दरवाजाचा वापर चढण्या-उतरण्यासाठी करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता