Monday, May 12, 2025

ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीपालघर

PM Modi : सावरकरप्रकरणी काँग्रेसने माफी मागितली का?

PM Modi : सावरकरप्रकरणी काँग्रेसने माफी मागितली का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल


पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे सिडको ग्राउंड येथे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. मात्र, विरोधकांनी कधीही माफी मागितली नाही. उलट ते न्यायालयात गेले, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे नाव न घेता टीका केली.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर नेहमी बोलले जाते. त्यांचा अपमान केला जातो. मात्र, विरोधकांनी कधीही माफी मागितली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करूनही माफी तर मागितली नाहीच. मात्र, ते न्यायालयामध्ये जातात. त्यांना कधीही याबाबत पश्चात्ताप झाला नाही किंवा होत नाही. कारण हे त्यांचे संस्कार आहेत, असा टोलाही पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी लगावला.


महाराष्ट्रातील जनता त्यांच्या संस्कारांना चांगले ओळखते. पण आमचे संस्कार वेगळे आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर नाव न घेता हल्लाबोल केला.


Comments
Add Comment