Jio Reliance : जिओ धारकांसाठी आनंदवार्ता! जिओ देणार १०० जीबी मोफत क्लाउड स्टोरेज

मुकेश अंबानी यांची घोषणा


मुंबई : रिलायन्स जिओ (Jio Reliance) आपल्या ग्राहकांसाठी मोठी ऑफर घेऊन आली आहे. गुगलसह इतर कंपन्या काही जीबी मोफत देतात आणि त्यानंतर क्लाउड स्टोरेजसाठी शुल्क आकारतात. परंतु रिलायन्स जिओ लवकरच आपल्या ग्राहकांना १०० जीबीपर्यंत मोफत क्लाउड स्टोरेजची (Free Cloud Storage) सुविधा देणार आहे. या स्टोरेजमध्ये फोटो, व्हिडिओ किंवा कोणतेही डॉक्युमेंट्स साठवता येतील. ही माहिती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरधारकांना संबोधित करताना चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी दिली.


मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओ ही कंपनी पूर्ण एआय कव्हर करणारी उपकरणे आणि प्लॅटफॉर्म्सचा एक व्यापक सेट विकसित करत आहे, ज्याला ‘जिओ ब्रेन’ म्हटले जाते. कंपनी 'एआय एव्हरीव्हेअर फॉर एव्हरीवन' या थीमवर हे लॉन्च करणार आहे. सर्व ग्राहकांना भारतातील एआय अनुप्रयोग अधिक परवडण्यासाठी जिओकडून ही नवी योजना आखली जात आहे. त्याचबरोबर जामनगरमध्ये पूर्णपणे रिलायन्सच्या हरित ऊर्जेवर चालवले जाईल, अशी 'गीगावॅट-स्केल एआय-सज्ज डेटा सेंटर' स्थापन करण्याची योजना आखत आहोत, असे अंबानी यांनी म्हटले.



कोणत्या एआयची सेवा मिळणार?


जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी अनेक नवीन एआय सेवांची घोषणा केली. यात जिओ टीवीओएस, HelloJio, Jio Home IoT सोल्यूशन, JioHome अॅप आणि Jio Phonecall AI यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)