हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
अहमदाबाद : मुसळधार पाऊस आणि पुरानंतर आता गुजरातला (Gujrat) असना चक्रीवादळाचा (Cyclone Asna) धोका निर्माण झालाय. तब्बल ४८ वर्षांनी अरबी समुद्रात निर्माण झालेले हे चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) सौराष्ट्र आणि कच्छमध्ये रेड अलर्ट जारी केलाय. याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरी भागात पावसासोबतच ताशी ७० किमी वेगाने वारे वाहत आहेत. पुढील ३ दिवस येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता या भागातील लोकांना सतर्कतेचा आणि सागरी क्षेत्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-दक्षिणपश्चिम कडे सरकण्याची शक्यता आहे आणि कच्छ आणि लगतच्या पाकिस्तानी किनारपट्टीजवळील ईशान्य अरबी समुद्रात निर्माण होऊन शुक्रवारी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या वादळाला ‘असना’ असे नाव देण्यात आले आहे.
यंदा गुजरातमध्ये सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेशात या वर्षी १ जून ते २९ ऑगस्ट दरम्यान ७९९ मिमी पाऊस पडला आहे, तर याच कालावधीत सरासरी ४३०.६ मिमी पाऊस झाला होता. या काळात सरासरीपेक्षा ८६ टक्के जास्त पाऊस झाला. मध्य आणि लगतच्या उत्तर बंगालच्या उपसागरावरील आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि शुक्रवारपर्यंत पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर अधिक चिन्हांकित होण्याची शक्यता आहे. “ते उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकण्याची आणि रविवारपर्यंत पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर तीव्र दबाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.