तरुणीची आत्महत्या! मन्सुरीच्या अटकेसाठी नाशकात महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

नाशिक : नाशिकरोड येथील देवळाली गाव परिसरातील राजवाडा भागात राहणाऱ्या एका पंधरा वर्षाच्या युवतीने परिसरात राहणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सदर घटनेप्रकरणी संबंधित युवक व त्याच्या नातेवाईकांना कठोर शासन करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी परिसरात राहणाऱ्या संतप्त महिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. तसेच यासंबंधी नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना निवेदन देण्यात आले.


देवळाली गाव राजवाडा परिसरात राहणाऱ्या एका युवतीला याच भागात राहणारा कलाम इजहार मन्सुरी हा युवक छेडछाड करून तिला त्रास देत होता. त्याचप्रमाणे सदरची युवती कॉलेजला जात असताना व येत असताना तिचा पाठलाग करून छळ करीत असे. या त्रासाला कंटाळून सदर युवतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार चार ते पाच दिवसापूर्वी घडला होता. या घटनेनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात कलाम इजहार मन्सुरी याच्याविरुद्ध तसेच इतर नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मात्र, यातील आरोपीवर पोलिसांनी अद्याप पाहिजे तशी कारवाई केली नसल्याने संतप्त झालेल्या देवळाली गाव राजवाडा येथील महिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांना जाब विचारला. तसेच संबंधित आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी या महिलांनी केली. या मोर्चात प्रज्ञा उघडे, ज्योती इंगळे, आशा खडसे, दीक्षा आढाव, वनिता उघडे, मीना भालेराव, छाया गौंड, वंदना अहिरे, ज्योती पंडित यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र