Mumbai News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा खंडित

मुंबई : मुंबई महापालिकेने गणेशोत्सवापूर्वी पालिकेसंदर्भातील (Mumbai Municipality) कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने एच पश्चिम विभागातील जुने आणि जीर्ण झालेल्या मुख्य जलवाहिनींच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे मुंबईत उद्या काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित राहणार असून नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पाली हिल जलाशय-१ मधील मुख्य जलवाहिनीची दुरूस्ती आणि वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक ३२ दरम्यान नव्याने टाकलेल्या ७५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या वांद्रे आणि खार परिसरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.



कोणत्या भागात असणार पाणीपुरवठा बंद?



  • पेरी परिक्षेत्र - वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग

  • खार दांडा परिक्षेत्र - खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबांध झोपडपट्टीलगतचा काही भाग

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिक्षेत्र - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिममधील काही भाग.

Comments
Add Comment

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या