Friday, June 20, 2025

Konkan Railway : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! आता वांद्रेपासून सुटणार मडगाव एक्सप्रेस

Konkan Railway : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! आता वांद्रेपासून सुटणार मडगाव एक्सप्रेस

जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक


मुंबई : गणेशोत्सवाला (Ganeshotsav) अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून चाकरमानी बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जातात. त्यामुळे तिकीट आरक्षण मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमते. चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहता मध्य रेल्वे (Central Railway) , पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येतात. अशातच मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणावासीयांनी मडगाव एक्सप्रेस (Madgaon express) सुरु करावी अशी मागणी रेल्वे प्रशासनाला केली होती. त्या मागणीला रेल्वे बोर्डाने मान्यता देत बांद्रा- मडगाव एक्स्प्रेस सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच आजपासूनच बोरिवलीहून मडगावसाठीची उद्घाटनाची ही विशेष एक्स्प्रेस रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा कोकणप्रवास आता आणखी सोयीस्कर होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १०११६/५ मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. २० डब्ब्यांची ही एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. तसेच आजपासून या एक्सप्रेसचे तिकीट आरक्षणाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही एक्सप्रेस वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमाळी स्थानकांवर थांबणार आहे.



कसे आहे वेळापत्रक?



  • ३ सप्टेंबरपासून दर मंगळवारी आणि गुरुवारी मडगावहून ७.४० वा. सुटेल. त्याच दिवशी वांद्र्याला ११.४० वाजता पोहोचेल.

  • ४ सप्टेंबरपासून दर बुधवार आणि शुक्रवारी वांद्र्याहून स. ६.५० वाजता सुटेल, मडगाव येथे रात्री १० वाजता पोहोचेल.

  • श्रेणी – एसी २ टायर, एसी ३ टायर, एसी ३ इकॉनॉमी, द्वितीय श्रेणी, शयनयान आणि द्वितीय

Comments
Add Comment