Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीHealth: बदाम-अक्रोडलाही टाकेल मागे हे ड्रायफ्रुट्स, शरीराला मिळेल ताकद

Health: बदाम-अक्रोडलाही टाकेल मागे हे ड्रायफ्रुट्स, शरीराला मिळेल ताकद

मुंबई: टायगर नट्सला अर्थ आलमंड अथवा अर्थ नट असेही म्हटले जाते. यात ड्रायफ्रुट्स इतकीच पोषकतत्वे आढळतात. यात फायबर, व्हिटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय यात आर्यन, फॉस्फरससोबतच अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट आढळतात.

आज आम्ही तुम्हाला टायगर नट्सपासून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल सांगत आहोत. टायगर नट्समध्ये डाएट्री फायबर असतात. यामुळे हे पचनासाठी अतिशय फायदेशीर असतात. दररोज १० ग्रॅम टायगर नट्सचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

यात फायबर असल्याने हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. त्यामुळे शरीरातील कॅलरी इनटेक कमी होतो. तसेच वजनही वाढत नाही.

टायगर नट्सचे सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहे. यातील फायबर पोटातील शुगरचे अवशोषण धीम्या गतीने करतात. यामुळे ब्लड शुगर वाढत नाही.

टायगर नट्समध्ये आढळणाऱ्या प्रोटीनमध्ये १८ अमिनो अॅसिड असतात. यातील काही अमिनो अॅसिड जसे लायसिन आणि ग्लायसिन उपलब्ध असतात. यामुळे हाडे, मसल्स आणि कनेक्टिव्ह टिश्यूंना फायदा होतो.

टायगर नट्सचे सेवन केल्याने लिबिडो आणि सेक्सुअल हेल्थमध्ये सुधारणा होते. टायगर नट्सच्या दुधात प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस असते सोबतच व्हिटामिन सी आणि ईही असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -