Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा खंडित

  281

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला (Thane Municipal Corporation) मे स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवारी सकाळी ९वाजता ते गुरूवार सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेवून त्यांच्या योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरूस्तीचे महत्वाचे कामाकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.


परिणामी घोडबंदर रोड, पवारनगर, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, कासारवडवली, विजयनगरी, विजय पार्क, राममंदिर रोड, मानपाडा, टिकूजीनीवाडी, हिरानंदानी इस्टेट, ढोकाळी, यशस्वीनगर, मनोरमानगर, माजिवडा, कापूरबावडी, सोहम इस्टेट, उन्नती, सुरकुरपाडा, जयभवानी नगर आणि मुंब्रा रेतीबंदर इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच समतानगर, ऋतूपार्क, सिध्देश्वर, आकृती, दोस्ती, विवियाना मॉल, वर्तकनगर, रुस्तमजी, नेहरूनगर, किसननगर-२, इटनिर्टी, जॉन्सन, जेल, साकेत इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहील.


सदर शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारतात दौऱ्यावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चा नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आगामी

रिपेअरला दिलेल्या फोनमधून महिलेचे प्रायव्हेट व्हिडीओ लीक, पुढे जे घडलं..

कोलकाता: आज असा कोणताच व्यक्ति दिसणार नाही, ज्याच्याकडे मोबाईल नाही. मोबाईल आज मूलभूत गरजेची वस्तु बनत चालला

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला

पॅरिस : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप

आशिया कप २०२५ पूर्वी बीसीसीआयमध्ये मोठे बदल, राजीव शुक्ला बनले हंगामी अध्यक्ष

मुंबई : एशिया कप 2025 मध्ये भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध होणार आहे,त्याला सुरू होण्यास आता दोन

हिमाचल प्रदेश : चंबा येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा आणि भरमौर परिसरात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. भरमौर परिसर

बिहारच्या ३ लाख मतदारांना निवडणूक आयोगाची नोटीस

परदेशी नागरिक असल्याच्या संशयावरून बाजवली नोटीस पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण