Friday, March 28, 2025
Homeक्रीडाWTC: बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानची वाईट स्थिती

WTC: बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानची वाईट स्थिती

मुंबई: बांग्लादेश क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करताना पाकिस्तानला रावळपिंडी कसोटी सामन्यात १० विकेटनी हरवले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्ध पहिला विजय आहे. सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला ३० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांनी विकेट न गमावता पूर्ण केले. तसेच सामना आपल्या नावे केला. पहिल्यांदा पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात १० विकेटनी पराभव सहन करावा लागला.

पराभवानंतर पाकिस्तानला झटका

बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेतही मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानचा संघ आता आठव्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ६ सामन्यात दोन विजय आणि चार पराभवासह २२ गुण मिळवले आहेत. तर बांगलादेशचा संघ शानदार विजयासह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशने ५ सामन्यात २४ गुण मिळवले आहेत.

WTC गुणालिकेत सध्या भारतीय संघ ६८.५२ टक्के अंकांसह अव्वल स्थाावर आहे. भारताने आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये ६ विजय आणि दोन पराभव तसेच एक अनिर्णीत असे ७४ गुण मिळवले आहेत. कांगारूच्या संघाने १२ सामन्यात ८ विजय, तीन पराभव आणि एक अनिर्णीतसह ९० अंक मिळवले आहेत. त्यांची टक्केवारी ६२.५० इतकी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -