Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २५ ते ३१ ऑगस्ट २०२४

Share

साप्ताहिक राशिभविष्य, २५ ते ३१ ऑगस्ट २०२४

व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव

मेष : आपण केलेले कार्य नावाजले जाऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर असेल. सर्वत्र गौरव व प्रशंसेस पात्र ठराल. सामाजिक अथवा धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. त्यासाठी स्वतःचा वेळ व पैसा खर्च कराल. मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती उत्तम राहील. सकारात्मक विचारांच्या व्यक्ती भेटतील. नवीन ओळखीतून चांगले लाभ होतील मात्र आपण स्वतः सकारात्मक राहून प्रतिसाद देणे गरजेचे ठरेल. व्यवसाय-धंद्यातील आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. नवीन नियोजन करू शकाल अथवा व्यवसाय विस्ताराच्या बाबतीमध्ये विचार करू शकाल.

प्रश्न सुटतील

वृषभ : आपण व्यवसाय-धंद्यातील तेजी अनुभवू शकाल. दीर्घकाळ रखडलेली व्यावसायिक येणी अचानक वसूल झाल्यामुळे आश्चर्य वाटेल. व्यवसाय-धंद्यात काही नवीन बदल करावेसे वाटतील ते जरूर करा. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून ते फायदेशीर ठरतील. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराचे म्हणणे ऐकून घ्या. त्याप्रमाणे निर्णय घ्या. व्यावसायिक प्रदर्शने व मुलाखती सफल राहतील. कुटुंबातील मुला-मुलींकडून सुवार्ता मिळतील. त्याचप्रमाणे कुटुंबात एखादे मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. तरुण-तरुणींचे प्रश्न निकालात निघतील. महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नियोजन सफल राहील. नोकरीविषयक प्रश्न सुटतील. चिंता मिटतील.

परिचयोत्तर विवाह

मिथुन : कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होण्यामधील अडीअडचणी अथवा समस्या दूर होऊन विवाह निश्चित होतील. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील. तरुण-तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल. प्रेमात यश संपादित करू शकाल. मात्र अति आत्मविश्वासाने कोणतेही कार्य करू नका. गैरसमज होण्याची शक्यता. कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील. नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील. व्यवसाय-धंद्यात काही नवीन संधी निर्माण होतील. त्याचा फायदा अवश्य घ्या. तसेच व्यावसायिक पद्धतीत बदल करावेसे वाटतील. कुटुंबातील बहुतेक सदस्यांचे आपल्याला अपेक्षित सहकार्य मिळेल.

उत्पन्नाचे नवे स्त्रोत

कर्क : या सप्ताहात काही चांगल्या गोष्टींचा लाभ घेता येईल. नोकरीत मात्र वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. नोकरीत बदल संभवतो. धार्मिक कार्यात रस वाढेल. आपल्या बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत दिसतील. महत्त्वाचे प्रश्न सुटल्यामुळे ताणतणावरहित वातावरणाचा लाभ मिळेल. कुटुंबातील मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर बातम्या कानावर येतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल. सामाजिक कार्यात भाग घेऊ शकाल. सभा समारंभाची निमंत्रणे मिळतील. एखादे मानाचे स्थान किंवा पद मिळेल.

कोर्टकचेरीच्या कामात सफलता

सिंह : सदरील काळामध्ये कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास सुख-समाधान मिळेल. कुटुंबातील प्रश्नांकडे अथवा समस्यांकडे लक्ष दिल्यास त्या लवकर सुटतील. व्यवसाय-धंद्यामध्ये परिस्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी येतील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यवसायातील नवीन बदल व्यवसायासाठी पोषक ठरतील. स्थावर मालमत्ताविषयीचे प्रश्न सोडविता येतील. शेतीविषयक कामांना चालना मिळेल. कोर्टकचेरीच्या कामात सफलता मिळेल. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.

नवीन नवीन संधी…

कन्या : या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचे सोने करणे आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेवावे. प्रयत्न कमी पडू देऊ नयेत. सतत कार्यमग्न राहण्याची गरज. नोकरीमध्ये वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. तसेच काही नवीन संधी मिळू शकतील. त्या संधी एक आव्हान म्हणून स्वीकारल्या तर त्याचा फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. आर्थिक लहान-मोठे व्यवहार सावधानतेने करावेत. वाहने चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

परदेशगमन…

तूळ : दीर्घकाळ रखडलेले जमिनीविषयीचे अथवा स्थावर मालमत्तेच्या विषयीचे व्यवहार गतिशील होतील. ओळखी-मध्यस्थीमुळे आर्थिक फायदा होऊ शकतो. मात्र वाद-विवाद टाळा. तसेच वडिलोपार्जित संपत्ती विषयीचे वाद शमतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार मार्ग निघेल. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. अपेक्षित गोष्टी साध्य होतील. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. कुटुंब परिवारात अचानक काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांचे परदेश गमन सफल होईल.

महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल

वृश्चिक : हा आठवडा सर्व बाबतीत आनंददायी व अनुकूल घटनांनी व्याप्त राहील. बरेच दिवस मनात घोळत असलेली एखादी महत्त्वाकांक्षा अचानक पूर्ण होईल. महत्त्वाची कामे उरकून घ्या. विशेषतः स्थावर, जमिनीविषयी असलेली कामे गतीमान होतील. कुटुंबात असलेले वाद-विवाद व मतभेद संपतील. नवीन नात्यास सुरुवात होईल. कुटुंबात मंगल कार्य घडेल. नोकरी-व्यवसायात तसेच धंद्यात अपेक्षित असलेली सर्व कामे होतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. मात्र भागीदारी व्यवसायात आपल्या वर्चस्वाला नियंत्रणाखाली ठेवा.

महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल

धनु : या आठवड्यात आपण काही रखडलेले महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. कुटुंब परिवारातील समस्या त्यामुळे सुटतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. नोकरीविषयक अनुकूल वार्ता कानावर येतील. पूर्वी दिलेल्या मुलाखतीमधून नोकरीचे बोलावणे येऊ शकते. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्याशी संबंध सुधारतील. मंगल कार्याचे निमंत्रण मिळेल; परंतु आपल्या बोलण्याने आणि वर्तणुकीने रंगाचा बेरंग होऊ शकतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.

स्पर्धा टाळा

मकर : महत्त्वाच्या कामात या आठवड्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. थोडा संयम बाळगणे गरजेचे आहे. कामाचा ताण जाणवू शकतो. दगदग होईल. व्यवसाय-धंद्यात जबाबदारी वाढेल. केलेल्या नियोजनात अचानक बदल करावा लागल्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आपल्याला झेपतील अशी कामे स्वीकारा. प्रवास काळजीपूर्वक करा. सावधानता बाळगा. प्रवासात खाण्यापिण्यावर नियंत्रण हवे. तसेच अति आत्मविश्वास घातक ठरू शकेल. स्पर्धा टाळा. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक राहील. इतरत्र वेळेचा अपव्यय करू नका.
तसेच कुसंगतीपासून दूर राहा.

आत्मविश्वास वाढेल

कुंभ : सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस घ्यायला, दानधर्म करावासा वाटेल. धार्मिकस्थळी सहकुटुंब, सहपरिवार भेट देण्याचे नियोजन होईल. मानसन्मान वाढेल. काही चांगल्या घटना घडतील. त्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. मात्र नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेणे गरजेचे ठरेल. नोकरीतील बदल चांगला राहील. सरकारी स्वरूपाच्या नोकरीमध्ये अधिकारात वाढ होईल. अतिरिक्त कार्यभार सोपवला जाण्याची शक्यता. मात्र लहान-मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा. कुटुंब परिवारातील एखाद्या मंगल कार्यामुळे नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात केलेले नवीन बदल व्यवसायासाठी
पोषक ठरतील.

कार्यमग्न राहा

मीन : पूर्वी केलेल्या नियोजनाद्वारे आपली कामे काळजीपूर्वक करा. लहान-मोठी कामे इतरांवर सोपवू नका. कार्यमग्न राहण्याची गरज प्रयत्नात कमी पडून देऊ नका. महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. मनावरील ताण काही प्रमाणात निघून जाईल. अडचणी दूर होतील. व्यवसायात भरभराट होईल. नवीन कामे हातात मिळतील. व्यवसाय व काम धंद्यानिमित्य प्रवास करावा लागेल. प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यायला विसरू नका. आपल्या बोलण्याने इतरांना आपण मंत्रमुग्ध कराल. तसेच खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळेल.

Recent Posts

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

43 minutes ago

Beautiful Anklets : चांदीच्या अँकलेटचे सुंदर ८ डिझाईन्स पहा!

महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…

57 minutes ago

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

1 hour ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

1 hour ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

2 hours ago