Badlapur Case : ‘त्या’ चिमुकल्यांचे १५ दिवसांमध्ये अनेक वेळा लैंगिक शोषण

एसआयटीच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक बाब उघड


मुंबई : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. १३ ऑगस्ट रोजी आरोपी अक्षय शिंदेने चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना आठवडाभरानंतर उघडकीस आली होती. या घटनेच्या तपासासाठी महायुती सरकारने एसआयटीची स्थापना करुन चौकशी सुरु केली आहे. आता या प्रकरणात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एसआयटीच्या प्राथमिक अहवालात ३ आणि ३ वर्षांच्या दोन्ही मुलींचे गेल्या १५ दिवसांत एकदा नव्हे तर अनेक वेळा लैंगिक शोषण झाल्याचे म्हटले आहे. यामुळे योनिपटलाचा भाग फाटल्याचेही अहवालात म्हटले आहे.


बदलापुरातील दोन चिमुकलींच्या अत्याचार प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात शाळा प्रशासन आणि पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरुन नागरिकांनी संताप व्यक्त करत रोष व्यक्त केला होता. सरकारनेही याप्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एसआयटीने तपास सुरु केला. त्यानंतर हे प्रकरण हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल शाळा प्रशासन आणि पोलिसांची सखोल तपासणी केली जात आहे. समितीच्या चौकशी अहवालात हे प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या शाळा प्रशासनावरही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या घटनेबाबत १४ ऑगस्टलाच मुख्याध्यापकांनी शाळेच्या विश्वस्तांना कळवले होते. मात्र तरीही शाळेने घटनेची माहिती देण्यास उशीर केल्याचे अहवालात म्हटले आहे. असे असतानाही शाळा प्रशासनाने संबंधित पालकांना माहिती दिली नाही किंवा त्यांची भेटही घेतली नाही.



महिलांच्या स्वच्छतागृहात ओळखपत्रांशिवाय प्रवेश


पीडित मुलींवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात १२ तासांनी उपचार करण्यात आले. तसेच आरोपी अक्षय शिंदे याला त्याची ओळख आणि पार्श्वभूमी तपासल्याशिवाय त्याला शाळेत कामावर घेण्यात आले. अक्षयने १ ऑगस्टपासूनच कंत्राटी कर्मचारी म्हणून काम सुरू केले. त्याला शाळेच्या सर्व भागासह महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला गेला होता.



शाळेचे शौचालय निर्जन ठिकाणी


दरम्यान, अक्षय शिंदे हा सराईत गुन्हेगार असल्याचा संशय असून त्याची पार्श्वभूमी तपासण्याची करण्यात येत आहे. त्यांची नियुक्ती कशी आणि कोणत्या संस्थेमार्फत करण्यात आली, याचाही तपास करण्यात येत आहे. शाळेचे शौचालय कर्मचाऱ्यांच्या खोलीपासून दूर एका निर्जन ठिकाणी होते आणि सुरक्षेसाठी तेथे सीसीटीव्ही बसवलेले नाहीत. शाळा व्यवस्थापनाने दावा केला होता की, दोन्ही मुलींनी बराच वेळ सायकल चालवली होती, त्यामुळे त्यांचा योनिपटलाचा भाग फाटला होती. मात्र एसआयटीने अहवालातून सत्य समोर आणले आहे.

Comments
Add Comment

Top Stock Picks Today: मोतीलाल ओसवालकडून 'या' २ शेअरला खरेदीचा सल्ला गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळणार?

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर खरेदीसाठी सूचवले आहेत. आजचे टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या कुठले

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

महाडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपने रचला इतिहास

फटाके फोडून, गुलाल उधळण्याची संधी तिघांनाही महाड निवडणूक चित्र संजय भुवड महाड : नगर परिषदेची २०२५ ची निवडणूक

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे