Nitesh Rane : उद्धव ठाकरेंचा मुलगा विकृत आणि घाणेरडा!

  209

उद्धव ठाकरेंनी खुलासा न केल्यास आमदार नितेश राणे महाराष्ट्रासमोर आदित्य ठाकरेवरील तक्रारींचा पाढा वाचणार


मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा मोर्चा मातोश्रीवर काढणार!


मुंबई : सध्या बदलापूर अत्याचार प्रकरणावरून शिल्लक सेनेचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांची पिलावल भाजपा सरकारविरोधात राजकारण करत आहेत. परंतु महिला अत्याचाराच्या नावाने बोंबा मारणा-या उद्धव ठाकरेंच्या दिवट्याने केलेले उपद्व्याप महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी त्या गोष्टी दाबून ठेवल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे, याचा जनतेसमोर खुलासा करावा. अन्यथा मी स्वत: त्या तीन लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा मोर्चा मातोश्रीवर काढेन आणि महाराष्ट्रासमोर आदित्य ठाकरेने (Aaditya Thackeray) केलेल्या दुष्कर्माचा पाढा वाचेन, असा गौप्यस्फोट भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.


आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, लहान मुलांच्या अत्याचारप्रकरणी विरोधक राजकारण करत आहेत. परंतु लहान मुलांच्या संरक्षणासाठी '८० पीसीआर' आयोग आहे. त्या आयोगाकडे आदित्य ठाकरे संदर्भात लहान मुलांना छळण्याबाबत तीन तक्रारी दाखल केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या घरात एक विकृत आणि एक घाणेरडा मुलगा जन्माला आलेला आहे. आदित्यने जे काय केले ते लपवून कशाला ठेवता?


बदलापुरमधील प्रकरणाबाबत सरकार आणि पोलीस कुठलीही दयामाया न दाखवता, आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहेत. पण त्याआधी उद्धव ठाकरे यांनी त्याच्या मुलाविषयी लहान मुलांसोबत केलेल्या कृत्याबद्दल माहिती द्यावी, अन्यथा त्या लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा मोर्चा मी स्वत: मातोश्रीवर काढेल व आम्हाला आदित्य ठाकरेपासून संरक्षण द्या अशी मागणी करेल, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.


तसेच दुसऱ्यावर आरोप करण्याआधी संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) आणि त्याचा मालक यांनी त्याच्या घरातल्या नराधमाला आधी आवरावे, असे म्हणत नितेश राणे यांनी त्यांना चांगलेच फटकारले.



भांडुपच्या झाकणझुल्यात आज संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankukle) ही वाया गेलेली केस आहे, असे भाष्य केले होते. त्यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चोख प्रत्युत्तर देत धारदार टीकास्त्र सोडले आहे. आज राजाराम राऊत जिवंत असते तर, त्यांचा मुलगा बाद झालेला आहे आणि महाराष्ट्रात तो बॉलीवूडमधल्या शक्तीकपूरचा रोल प्ले करतोय हे त्यांना समजले असते.


संजय राजाराम राऊत हा डॉक्टर पाटकर महिलेला रोज छळत आहे. डॉक्टर महिलेच्या घरावर दारुच्या बाटल्या मारल्या जातात, तिला 'आयुष्यातून संपवून टाकणार' अशी धमकी या संजय राजाराम राऊतची माणसे देत असतात. तसेच या डॉक्टर महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले पाहिजे, असे सातत्याने सांगत आहे. मात्र याच्या मालकाच्या मुलावर लहान मुलांना छळण्याबाबत असणाऱ्या तक्रारींचा खुलासा करावा, अशी जोरदार टीका नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

Comments
Add Comment

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, ओबीसी नेत्यांसोबत आज घेणार महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र