Nitesh Rane : महाविकास आघाडी नेत्यांचे घाणेरडे राजकारण; त्यांना सत्तेशिवाय काहीच दिसत नाही!

न्यायालयावर खुर्ची लावून संजय राऊत सारख्या माकडाला बसवा


आमदार नितेश राणे यांचा विरोधकांवर हल्लाबोल


मुंबई : बदलापुरमध्ये (Badlapur Crime) काल जो काही विकृत प्रकार झाल्यानंतर राज्यातील सर्व प्रतिनिधी सरकार काल अ‍ॅक्शन मोडवर गेला आहे. महायुती (Mahayuti) सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अ‍ॅक्शन घ्यायला सुरु केली. यातच एकीकडे एसआयटी स्थापन झाली आहे आणि सरकार म्हणून सगळ्यांच एकस्पष्ट मत आहे की, कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. फाशीच्या शिवाय दुसरी कोणताही पर्याय असता कामा नये, ही भूमिका मांडली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीमधील मालक आणि त्यांचे चेले अत्याचार प्रकरणाबाबत त्यांचे घाणेरडे राजकारण दाखवत आहेत, असा घणाघात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.


काल बदलापूरमध्ये झालेल्या जनक्षोभानंतर राज्यसरकार अ‍ॅक्शन मोडवर गेला आहे. त्याप्रमाणे कारवाई देखील सुरु झाली आहे. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) आणि सुप्रिया सुळे यांना सत्तेशिवाय काही येत नाही. महायुती सरकारचे विरोधक इतक्या खालच्या दर्जाचे असतील, याची कोणालाही अपेक्षा नाही. कारण कोलकातामध्ये झालेल्या हत्याकांड तसेच बांग्लादेशमधील हिंदूंबद्दल झालेल्या हिंसाचाराबाबत महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी आपले वक्त्व्य मांडले नाही. परंतु काल बदलापूर प्रकरणाबाबत यांनी मांडलेले त्यांचे वकत्तव्य हे फक्त घाणेरडे राजकारण होते. त्यांनी केलेले वकत्व्य हे कोणत्याही माताभगिनी किंवा महाराष्ट्रासाठी नसून केवळ सत्तेसाठी होते. त्यांना 'सत्ता एके सत्ता' याशिवाय त्यालोकांना काहीही दिसत नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.



संजय राऊतने 'लाडकी डॉक्टर योजना' राबवावी


त्याचबरोबर, महाविकास आघाडीचे सरकार असताना महिला किती सुरक्षित होत्या याचा पाढा वाचावा लागेल, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने बोलूच नये. उद्धव ठाकरेच्या घरामध्येच एक बलात्कारीचा आरोपी आहे, जो त्याच्यासोबत मातोश्रीमध्ये राहतो. तर संजय राजाराम राऊत याने आता 'लाडकी डॉक्टर योजना' राबवली पाहिजे. कारण एका डॉक्टर महिलेचा कसा छळ होतो, हे तिने सातत्याने पोलिसांना सांगितलेले आहे. त्यामुळे यांची माताभगिनींबद्दल बोलण्याची लायकी नाही, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. तसेच महायुती सरकार या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. त्यांना फाशीवर चढवल्याशिवाय गप्प बसणार नाही, ही स्पष्ट भूमिका नितेश राणे यांनी मांडली.



संजय राऊत शेंबड्यासारखे बडबडू नकोस


ज्या शाळेत ही घटना घडली ती भाजपाच्या संबंधित आहे. तसेच जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा न्यायालय दखल घेतात परंतु अशा घटनेनंतर न्यायालयाने का दखल घेतली नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यावर नितेश राणे यांनी चोख उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, 'भाजपाच्या संबधित जरी ही घटना घडली असेल तरीही आम्ही कारवाई करण्याचे थांबलो नाही. तुझ्या नालायक मालकासारखे आम्ही सरकार चालवत नाही. जो कोणी आरोपी होता, ज्या संस्थेमध्ये हे घडले आणि अशी घटना कधीही आपल्या संस्थेत घडू नये असे प्रत्येक संस्थेला वाटते. म्हणून भाजपाच्या संबंधित ही संस्था असली तरीही कारवाई होत आहेच. म्हणून उगाच शेंबड्यासारखे बडबडत राहू नकोस, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकारले.


तसेच न्यायालयालाही मार्गदर्शन करण्याइतका तू दीड शहाणा झाला आहे. तर आता न्यायालयावर अजून एक खुर्ची लावून संजय राजाराम राऊत सारख्या माकडाला बसवा, असे म्हणत नितेश राणे यांनी डिवचले.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम