मुंबई: मोटोरोलाने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन जी45 5जी स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. या स्मार्टफोन कंपनीने ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि ४ आणि ८ जीबी या दोन व्हेरिएंटमध्ये उतरवला आहे. हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोनन आहे. याची किंमत कंपनीने कमी ठेवली आहे. यात पॉवरफुल प्रोसेसर आहे.
मोटोरोलाच्या नव्या स्मार्टफोनमध्ये Qualcomm SD 6s Gen 3 6nm प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा IPS LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटलाही सपोर्ट करो. कंपनीने स्मार्टफोन ४ जीबी आणि ८ जीबी सारख्या दोन रॅमसोबत बाजारात सादर केला आहे. स्टोरेजच्या रूपात कंपनीने १२८ जीबी स्टोरेज दिला आहे.
पावरसाठी Moto G45 5G फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेरा सेटअपबाबत बोलायचे झाल्यास मोटोरोलाच्या या फोनमध्ये कंपनीने 50MP प्रायमरी कॅमेरासह 8MPचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आलाआहे. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
मोटोरालाच्या या फोनची किंमती कंपनीने ९,९९९ रूपये ठेवली आहे. दरम्यान, याच्या 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रूपये ठेवली आहे. तर स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रूपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनला तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…