पेण : पेण तालुक्यातील दादर गावातील शाळेत शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या दोन परप्रांतीयांना गावातील महिलांनी बेदम चोप देऊन डांबून ठेवले. दादर सागरी पोलीस वेळेत घटनास्थळी हजर झाल्याने पुढील अनर्थ टळला. दोन्ही परप्रांतीय आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींची छेडछाड प्रकरणे सुरू असतानाच २० ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास दादर गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दोन अल्पवयीन मुलींची परप्रांतीय आरोपी अखिलेश शामजी सैनी वय २० वर्षे आणि मुंनुकुमार त्रिभुवन चौहान वय २२ वर्षे, दोघेही सध्या राहणार जिते, ता. पेण व मुळ राहणार धंधरा, पो. लक्ष्मीनगर, ता. तुळशीपुर, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश यांनी त्या मुलींचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने मोबाईल व चॉकलेट दाखवून हाताने बोलवण्याचा इशारा करून अश्लील हावभाव करत छेडछाड केली.
सदर प्रकार अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांना, गावकऱ्यांना व गावातील महिलांना समजताच त्यांनी दोन्ही परप्रांतीय आरोपींना पकडून बेदम चोप देत डांबून ठेवले. ही घटना दादर सागरी पोलिसांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशे हे अधिक तपास करीत आहेत.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…