२ डझन ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपवर ईडीचे लक्ष!

परदेशात ११ लाख कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा ईडीचा संशय


नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अवैधरीत्या ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप चालवत त्याद्वारे हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या महादेव अ‍ॅपचा पर्दाफाश करण्यात आला. यावेळी अनेक कलाकारांना याचा फटका बसला. त्यानंतर आता अशा पद्धतीच्या अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या गेमिंग अ‍ॅपवर ईडीची नजर असणार आहे. सध्या ईडीचे लक्ष २ डझन गेमिंग अ‍ॅपवर असून यामधून तब्बल ११ लाख कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय ईडीला आहे. अनेक परदेशी अ‍ॅप चालवले जात असल्याचा संशय असल्याने ईडी सध्या अलर्ट मोडवर आहे.



महादेव ऍपचा फटका 


देशभरातली लाखो लोकांना महादेव या गेमिंग अ‍ॅपचा फटका बसला. या अ‍ॅपच्या मालकांनी हवाला आणि इतर मार्गांनी हा पैसा दुबईमध्ये वळवल्याचे आढळले. त्यानंतर याच पार्श्वभूमीवर अनेक परदेशी अ‍ॅप चालवले जात असल्याचा संशय असल्याने ईडी सध्या अलर्ट मोडवर आहे. बेकायदेशीरपणे चालवले जाणारे अ‍ॅप भारतामध्ये पसरत असल्याची माहिती ईडीला मिळाल्यानंतर तब्बल २ डझन अ‍ॅपवर ते लक्ष ठेवून आहेत. या अ‍ॅप्सद्वारे जमा होणारे पैसे ही क्रिप्टो करन्सीच्याद्वारे तसेच काही बनावट आर्थिक व्यवहार करत परदेशात जात असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यामुळे याचा भारतीय वापरकर्त्यांना चांगलाच फटका बसत आहे. पण, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास करणे हे यंत्रणांपुढील मोठे आव्हान आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एका अ‍ॅपचा सुगावा यंत्रणांना लागला की, ते अ‍ॅप चालवणारे लगेच बंद करतात आणि त्याचप्रकारचे दुसरे अ‍ॅप अवघ्या काही दिवसांमध्ये सुरू करतात. यामुळे अशा अ‍ॅपवर आळा घालणे अवघड होते. पण देशभरातली अनेक यंत्रणा अशा गेमिंग अ‍ॅपद्वारे होणाऱ्या फसवणुकीविरोधात अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. ईडीसह समन्वय साधत अनेक तपास यंत्रणा या घोटाळ्यांचा तपास करत आहेत. रिझर्व्ह बँकेनेही बँकांना असे अ‍ॅप्स अथवा संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे अ‍ॅप्स प्रामुख्याने यूएई, श्रीलंका आणि दक्षिण आशियातील काही देशांतून सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे.

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा

Vaishno Devi Dham : आता रात्रीही घेता येणार माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुहेचे दर्शन, वाचा नवीन वेळापत्रक

कटरा : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी श्राईन बोर्डाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय

चकमकीत ठार झाला एक कोटींचे बक्षीस लावलेला नक्षलवादी अनल दा, इतर १४ नक्षलवादीही ठार

रांची : गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून झारखंड पोलिसांनी सारंडाच्या घनदाट जंगलात अनेक