Mumbai Crime : मुंबईतील खारदांडा परिसरात दोन अल्पवयीन मुलींना छेडण्याचा प्रयत्न!

आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात


मुंबई : सध्या देशभरातून बदलापूर (Badlapur Crime) अत्याचार प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बदलापूरची ही घटना ताजी असताना आता मुंबईतही (Mumbai) अशीच एक घटना आजीच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात टळली. मुंबईतील खारदांडा परिसरात एका नराधमाने दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान पोलीस याबाबत अधिक तपास करत असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमन सिंग हा दोन्ही अल्पवयीन मुलींच्या घराशेजारी राहत आहे. तर अल्पवयीन मुलींमधील एक मुलगी १२ तर दुसरी ६ वर्षांची आहे. या नराधमाने काल सहा वर्षीय मुलीला चिडवत व खेळायचे नाटक करत घरी घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी घरात असणाऱ्या मुलीच्या आजीने आरडा ओरड केल्यानंतर त्याला बाहेर काढले. परंतु यावेळी आरोपीने त्यांना धमकावले. तसेच मागील शनिवारी देखील बारा वर्षीय मुलीला खिडकीतून डोकावत इशारे केले होते. परंतु त्यावेळी आरोपीच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. पण सातत्याने त्याचे असे वागणे पाहून अल्पवयीन मुलींच्या आईवडिलांनी खार पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली.


दरम्यान, खार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉस्को अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ अमन सिंग या आरोपीला अटक केली. याप्रकरणी खार पोलीस अधिक तपास करत आहेत.


Comments
Add Comment

Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने

Mega Block : रविवारी ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक २६ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Western Railway : पश्चिम रेल्वेच्या १३ विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या

मुंबई, गुजरातहून बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे सेवांना मुदतवाढ मुंबई : प्रवाशांची

Weather Department : महाराष्ट्रासह १७ राज्यांत मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता मुंबई : भारतीय हवामान विभागाने देशातील हवामानाबाबत अत्यंत महत्त्वाचा

Mulund Station : मुलुंड स्थानकात पादचारी पुलासाठी मध्यरात्री विशेष ब्लॉक

२५० टन क्रेनने गर्डर लाँचिंगचे काम; दोन लोकल फेऱ्या रद्द मुंबई : मुलुंड रेल्वे स्थानकावर नवीन ६ मीटर रुंदीच्या

Indian Railways : मुंबई रेल्वे आरक्षण सेवा साडेतीन तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणालीमधील ‘स्टॅटिक’ आणि ‘डायनॅमिक’ फाइल्सच्या कॉम्प्रेशनच्या तांत्रिक