Monday, May 12, 2025

देशमहत्वाची बातमी

PM Modi Ukraine Visit: पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टला युक्रेनला जाणार, ३० वर्षानंतर भारतीय पंतप्रधान करणार दौरा

PM Modi Ukraine Visit: पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टला युक्रेनला  जाणार, ३० वर्षानंतर भारतीय पंतप्रधान करणार दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर जात आहेत. ३० वर्षानंतर एखादे भारतीय पंतप्रधान हा दौरा करत आहेत. याआधी पंतप्रधान मोदी २१-२२ ऑगस्टला पोलंड दौऱ्यावर जातील. ४५ वर्षानंतर भारताचे एखादे पंतप्रधान पोलँड दौऱ्यावर जातील. पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौऱा मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या भेटीनंतर एक महिन्यांनी होत आहे.



युक्रेनच्या आधी पंतप्रधान पोलँड दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ आणि २२ ऑगस्टला पोलँडमध्ये राहतील. येथे भारतीय समुदायाच्या लोकांशी बातचीत करतील. तसेच पोलँडमधील त्या स्मारकांचा दौराही करती जे जामनगर आणि कोल्हापूरचे मूळ राखून आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार भारत नेहमीच युक्रेनमध्ये युद्ध सोडवण्यासाठी कूटनिती आणि बातचीतला समर्थन देत असतो.



युक्रेनकडून अधिकृत विधान


पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्याबाबत तेथील राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाकडून अधिकृत विधान जारी करण्यात आले आहे. विधानात म्हटले की आमच्या द्वीपक्षीय संबंधाच्या इतिहासात एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा युक्रेनचा हा पहिलाच दौरा आहे. दौऱ्ययादरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्कीसोबत द्वीपक्षीय आणि बहुपक्षीय सहयोगाच्या मुद्द्यावर चर्चा होईल.


पंतप्रधान मोदींचा हा दौरा १९९१मध्ये युक्रेन स्वतंत्र झाल्यानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा पहिला दौरा असेल. गेल्या महिन्यात राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्कीचे चीफ ऑफ स्टाफ अँड्री यरमक यांनी म्हटले होते की पंतप्रधान मोदी युक्रेनमध्ये शांतता स्थापन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.


पंतप्रधान मोदींचा मॉस्को दौरा ९-१० जुलैदरम्यान नाटो शिखर संमेलनात झाली होती. शिखर परिषदेत अमेरिका आणि नाटो सहकाऱ्यांनी रशियाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेनला समर्थन देण्याबाबत एकजूट दाखवली होती. त्यावेळेस अमेरिकेने रशियासोबतच्या भारताच्या संबंधांबाबत चिंता व्यक्त केली होती.

Comments
Add Comment