Mohammed Shami: मोहम्मद शमीचे टीम इंडियामध्ये कधी होणार पुनरागमन? जय शाहनी दिली मोठी अपडेट

मुंबई: मोहम्मद शमीच्या(mohammad shami) पुनरागमनची प्रतीक्षा त्याचे चाहते करत आहेत. भारतीय खेळाडू सध्या रिहॅबमध्ये आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना १९ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२३मध्ये खेळला होता. वर्ल्डकपचा फायनलचा हा सामना होता. वनडे वर्ल्डकपचा हा शेवटचा सामना होता. वनडे वर्ल्डकपनंतर शमीच्या टाचेची सर्जरी करण्यात आली होती. यानंतर आतापर्यंत तो मैदानात परतलेला नाही. आता शमीच्या पुनरागमनाबाबत सरळ उत्तर मिळाले आहे.


रिपोर्टनुसार शमी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी रणजी ट्रॉफीसाठी बंगालकडून मैदानात उतरेल. रणजी ट्रॉफीची सुरूवात ११ ऑक्टोबरपासून होत आहे. ११ ऑक्टोबरला बंगालचासामना उत्तरप्रदेशविरुद्ध होईल. यात शमी खेळताना दिसू शकतो. रणजीनंतर शमी १९ ऑक्टोबरलासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मैदानावर दिसू शकतो.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शमीच्या पुनरागनचे संकेत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिले आहेत. ते म्हणाले, आमची टीम आधीपेक्षा चांगली तयार आहे. आम्ही काही काळासाठी जसप्रीत बुमराहला आराम दिला. शमी फिट होण्याची आम्ही आशा करतो.


मोहम्मद शमीकडे तीनही फॉरमॅट खेळण्याचा अनुभव आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत ६४ कसोटी १०१ वनडे आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने २२९ विकेट घेतलेत. तर वनडेत शमीने १९५ तर टी-२०मध्ये २४ विकेट घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या