मुंबई: जेव्हा नॉनव्हेज जेवण अनेक तास लंच बॉक्सच्या आत असते तेव्हा यात अनेक बॅक्टेरिया वाढू लागतात. या कारणामुळे ते धोकादायक स्थितीवर पोहोचतात.
खरंतर, नॉनव्हेजिटेरियन खाणे जसे मांस, चिकन तसेच मासे यामध्ये पोषकतत्वे आणि ओलावा असतो यामुळे बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. यात साल्मोनेला, इ कोलाय, कॅम्पिलोबॅक्टर आणि लिस्टेरिया नोमोसायटोजेन्स बॅक्टेरिया वाढू लागतात.
नॉन व्हेज पदार्थ लंच बॉक्समध्ये पॅक करून अनेक तास रूम टेम्परेचरला ठेवल्यास ते धोकादायक स्थितीत प्रवेश करतात. रूमचे तापमान २० डिग्रीपेक्षा अधिक असल्यास यात बॅक्टेरिया लगेचच वाढू लागतात.
अशा स्थितीत साल्मोनेला, स्टॅफिलोकोकोस ऑरियस सारखे बॅक्टेरिया शिजलेले चिकन आणि मांस यामध्ये वेगाने पसरतात.मासे, कोलंबी तसेच इतर मच्छीचे पदार्थ रूम टेम्परेचरला लवकर खराब होता आणि जर त्यांना थंड वातावरणात ठेवले नाही तर ते खराब होण्याची शक्यता सर्वाधिक असते.