रखडलेल्या २३३ झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण होणार

५१,५१७ झोपड्यांची जबाबदारी ‘एमएमआरडीए, एमएसआरडीसीवर


मुंबई : मुंबईतील रखडलेल्या २३३ झोपडपट्टी पुनर्वसन योजना आता मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महाप्रित, सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने या सातही सरकारी यंत्रणांवर अंदाजे २ लाख १३ हजार ३२१ झोपड्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीकडून ५१ हजार ५१७ झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यापैकी २४ हजार झोपड्यांचे पुनर्वसन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), तर २७ हजार झोपड्यांचे पुनर्वसन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाबरोबर संयुक्त भागीदारी तत्वावर तीन वर्षांत हे प्रकल्प मार्गी लावावे लागणार आहेत. शक्य तितक्या लवकर हे प्रकल्प हाती घेऊन निर्धारित वेळेत ते पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.


आजघडीला ५०० हून अधिक झोपु योजना विकासकांनी रखडवल्या आहेत. यात २००५ पासून २०२१-२२ पर्यंतच्या योजनांचा समावेश आहे. या योजना मार्गी लावण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून वरीलप्रमाणे शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही या यंत्रणांकडून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलली जात नव्हती. त्यामुळे आता सरकारने तात्काळ प्रकल्प हाती घेण्याचे निर्देश दिल्याचे समजते आहे. झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी यास दुजोरा दिला. एकूण नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणाऱ्या, रस्ते बांधणी, पायाभूत आणि मुलभूत सुविधांचा विकास करणाऱ्या यंत्रणा आता विकासक म्हणून झोपड्यांचे पुनर्वसन करताना दिसणार आहेत. दरम्यान, या योजनेतील पात्रता निश्चितीची आणि जमिनी मोकळ्या करून देण्याची जबाबदारी झोपु प्राधिकरणावर असणार आहे. तर विक्रीयोग्य घटकातून झोपु योजना राबविणाऱ्या यंत्रणांना प्रकल्पाचा खर्च वसूल करून महसूल मिळवता येणार असल्याचे समजते.















































संस्था



प्रकल्पांची संख्या



झोपड्या


महापालिका ७८ ५१,५८२
महाप्रित ५६ २५,२११
म्हाडा २१ ३३,६०७
सिडको १४ २५,७४०
एमआयडीसी १२ २५,६६४
एमएमआरडीए ७१ २७,२५१
एमएसआरडीसी ४५ २४,२६६

 
Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर १.६ कोटींच्या सोन्याची तस्करी, दोघांना अटक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत दोन सफाई

मुंबईतील रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक

मुंबई : राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. हे बाळ सध्या कूपर रुग्णालयात उपचार

मिनिटांत पार्सल पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका ऑर्डरमागे किती पैसे मिळतात ? जाणून घ्या वास्तव

मुंबई : आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन डिलिव्हरी ही आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. Zepto, Zomato, Amazon, Myntra यांसारख्या

महापालिका आयुक्त थेट घरीच पोहोचले आणि त्यांच्यात यंदाच्या दिवाळीत आनंदाची लहर उमटली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी म्हणजे असे व्यक्तिमत्व जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात

सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने